गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशवासियांना दिल्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2021 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2021
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशवासियांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीट संदेशात अमित शाह यांनी म्हटले आहे की, या महापर्वाच्या दिवशी मी देशाचे रक्षण करणाऱ्या आपल्या सर्व शूर सैनिकांना आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान स्वातंत्र्य सैनिकांना नमन आणि वंदन करतो. तुमचे बलिदान आणि समर्पण आम्हाला राष्ट्राची सेवा करण्यासाठी प्रेरणा देत राहील”.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, "एकीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाची नवनवी उंची गाठत आहे आणि दुसरीकडे गरीब आणि समाजातील वंचित वर्ग मुख्य प्रवाहाचा भाग झाल्यामुळे अभिमान बाळगत आहे. चला, जेंव्हा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे तेंव्हा मोदीजींचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भागीदार बनूया ”.
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख करताना अमित शाह म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नव्या भारताचे सामर्थ्य, ऐतिहासिक सुधारणा आणि नव्या संकलपांसह वाटचाल करत भारताला जागतिक स्तरावर अग्रणी होण्यासाठीच्या अपार क्षमता दर्शविल्या. त्यांचे हे भाषण आत्मनिर्भर भारताच्या अतूट संकल्पाचे प्रतीक आहे.
* * *
S.Thakur/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1746172)
आगंतुक पटल : 251