संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय तटरक्षक दलाकडून 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा

प्रविष्टि तिथि: 15 AUG 2021 6:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2021

भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आणि लोकांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवण्याच्या दृष्टीने भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी ) देशभरातील  वस्ती असलेल्या आणि निर्जन अशा निवडक 100 बेटांवर ध्वजारोहण केले. यापैकी 36 बेटे पश्चिम किनारपट्टीवर आहेत, तर 25 पूर्व किनाऱ्यावर आहेत. अंदमान आणि निकोबारच्या 24 बेटांवर, लक्षद्वीप आणि मिनीकॉयच्या 15 बेटांवर एकाच वेळी तिरंगा फडकवण्यात आला.

'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' चा भाग म्हणून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने देशभरातील विविध तटरक्षक केंद्रांवर कार्यक्रमांचेही आयोजन केले होते. यामध्ये मच्छिमारांशी संवाद कार्यक्रम, वृक्षारोपण मोहीम, सायक्लेथॉन्स, वॉकेथॉन्स, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि दुचाकी रॅली यांचा समावेश आहे.


* * *

S.Thakur/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1746126) आगंतुक पटल : 267
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी