उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी पारशी नववर्ष नवरोझच्या पूर्वसंध्येला देशवासियांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2021 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2021
उपराष्ट्रपती, एम.व्यंकय्या नायडू यांनी पारशी नववर्ष नवरोझच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या संदेश खालीलप्रमाणे:
"पारशी नवीन वर्षाची सुरुवात असलेल्या 'नवरोझ ' च्या पवित्र पर्वानिमित्त मी आपल्या देशातील जनतेला शुभेच्छा देतो.
मोठ्या पारंपारिक उत्साहाने साजरा केला जाणारा नवरोझ बंधुभाव, करुणा आणि सर्वांसाठी आदराचे प्रतीक आहे. आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पारशी समाजाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
कौटुंबिक नाते, बंधुत्व आणि एकतेच्या उत्सवात कुटुंब आणि मित्र नवरोझ सणाच्या निमित्ताने एकत्र येतात. मी सर्वांना आवाहन करतो की अत्यंत सावधगिरी बाळगून आणि कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून नवरोझ साजरा करु या.
येणारे वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो. सर्वांना नवरोज मुबारक. ”
* * *
G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1746085)
आगंतुक पटल : 239