संरक्षण मंत्रालय
लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती अमेरिका दौऱ्यावर
Posted On:
15 AUG 2021 11:25AM by PIB Mumbai
लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सी.पी. मोहंती पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. द्विपक्षीय लष्करी सहकार्य वाढवणे आणि उभय लष्करांदरम्यान संरक्षण भागीदारीसाठी भविष्यातील नवीन संधी शोधणे हा या भेटीचा उद्देश आहे.
लष्कर उपप्रमुख हवाई येथे होणाऱ्या बहुपक्षीय चीफ ऑफ डिफेन्स परिषदेला उपस्थित राहतील, ज्यामध्ये कोविड -19 मुळे राष्ट्रीय सुरक्षा कायम स्वरूपी कशी बदलेल; मुक्त आणि खुल्या हिंद -प्रशांत क्षेत्रात बहुपक्षीयवादाची भूमिका आणि आव्हाने आणि तंत्रज्ञान आधारित गुन्ह्यांची शक्यता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संधी या तीन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल: या भेटीदरम्यान लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती हे चीफ ऑफ डिफेन्स परिषदेला उपस्थित असलेल्या देशांच्या वरिष्ठ लष्करी नेतृत्वाशी देखील संवाद साधतील.
नंतर, लष्कर उपप्रमुख वॉशिंग्टन डीसीला जातील आणि अमेरिकेच्या लष्कराचे वरिष्ठ नेते आणि संरक्षण विभागाच्या नागरी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.उत्तम लष्करी उपकरणे विकसित करणाऱ्या प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह ऑफिस (पीईओ) सोल्जरलाही ते भेट देतील आणि कॉम्बॅट स्क्वाड , सैनिक टिकून राहण्याची क्षमता, सैनिक प्राणघातकता, सैनिकि डावपेच आणि अचूक लक्ष्य आणि एकात्मिक व्हिज्युअल ऑगमेंटेशन प्रणालीतील संशोधनाची पाहणी करतील. दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य वाढवणे हा या बैठकांचा उद्देश आहे.
***
MaheshC/SushmaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1746057)
Visitor Counter : 226