श्रम आणि रोजगार मंत्रालय

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई येथे मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेसाठी निवडणूक संपन्न

Posted On: 14 AUG 2021 6:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2021

केन्द्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या, मुख्य कामगार आयुक्त (केन्द्रीय) कार्यालयाने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई आस्थापना अंतर्गत  कामगारांचे प्रश्न मांडणाऱ्या मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेसाठी 4.8.2021 आणि 5.8.2021 रोजी निवडणूक घेतली. त्याची मतमोजणी 6.8.2021 रोजी झाली.

आस्थापनेत सुविहित ओद्योगिक वातावरणाची खातरजमा करण्यासाठी केआरसीएल व्यवस्थापनाने केलेल्या विनंतीवरुन ही प्रक्रीया करण्यात आली.

यंदा, दोन कामगार संघटना निवडणूक रिंगणात होत्या.

मान्यताप्राप्त कामगार संघटनेचा (एनआरएमयू) कार्यकाळ एप्रिल 2020 मधे संपला. मात्र कोविड-19 महामारीमुळे निवडणूक प्रक्रीया वेळेत होऊ शकली नव्हती.

कोविडची दुसरी लाट ओसरु लागल्यावर कामगार संघटना आणि व्यवस्थापनाने पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रीयेची मागणी उचलून धरली.

केआरसीएल कंपनीची स्थापना, कंपनी कायदा 1956 अंतर्गत झाली असून, त्याचे मुख्यालय महाराष्ट्रामधे, मुंबईत बेलापूर इथे आहे.

आस्थापनेचे कार्यक्षेत्र हे  740 किमी लांबीचा रेल्वे मार्ग असून तो महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांत पसरला आहे .  कोकणातल्या डोंगर रंगाबरोबरच संस्थेने जम्मू आणि काश्मीर सारख्या दुर्गम पर्वतीय भागातही  अवघड बांधकाम प्रकल्प उभारले आहेत.

 कोकण रेल्वे आस्थापनेचे कार्यक्षेत्र लक्षात घेता गोवा मार्गे बेलापूर ते मंगळुरु दरम्यान निवडणुकीसाठी  26 बूथ तयार करण्यात आले आहेत.  यात दिल्ली आणि जम्मू -काश्मीरमधील रियासीचाही समावेश होता .

केआरसीएलची निवडणूक प्रक्रीया यशस्वीपणे आणि शांततेत पार पाडल्याबद्दल मुख्य कामगार आयुक्त ( केन्द्रीय) श्री. डी.पी.एस. नेगी यांनी मुंबई विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, व्यवस्थापन तसेच सहभागी आणि विजयी कामगार संघटनांचे अभिनंदन केले.

 

 

 

 

Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1745868) Visitor Counter : 192


Read this release in: English , Urdu , Hindi