संरक्षण मंत्रालय
मेन्टेनन्स कमांडच्या कमांडर्सची परिषद
Posted On:
13 AUG 2021 9:20AM by PIB Mumbai
नागपूर येथे झालेल्या मेन्टेनन्स कमांड कमांडर्स परिषदेला,हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया, पीव्हीएसएम,एव्हीएसएम,व्हीएम एडीसी उपस्थित होते.वायू सेना नगर इथे 11 आणि 12 ऑगस्ट 2021 ला ही परिषद झाली. एअर मार्शल शशिकर चौधरी एव्हीएसएम, व्हीएसएम एडीसी एओसी-इन-सी मेन्टेनन्स कमांड यांनी हवाई दल प्रमुखांचे स्वागत केले.
मेन्टेनन्स कमांड अंतर्गत येणारे दुरुस्ती डेपो (बेस रिपेअर डेपो),साधनसामग्री डेपो, आणि इतर स्टेशन आणि विभागांचे कमांडर्स या दोन दिवसीय परिषदेला उपस्थित होते. सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांचा यावेळी आढावा घेण्यात आला आणि येत्या वर्षासाठीच्या उद्दिष्टांचा आणि कामांबाबत चर्चा करण्यात आली.
भारतीय हवाई दलाच्या विशाल आणि महत्वाच्या आवश्यकता पूर्ण करण्यामध्ये मेन्टेनन्स कमांडची महत्वाची भूमिका असल्याचे हवाई दल प्रमुखांनी यावेळी कमांडर्सना संबोधित करताना सांगितले. भारतीय हवाई दल आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज राखण्यासाठी कमांडने सुरु केलेल्या उपक्रमांबद्दल त्यांनी प्रशंसा केली. जटील काळात देखभाल आणि परिचालनात अधिक सुधारणेकरिता क्षमता वृद्धीची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली, ज्यासाठी स्वदेशी प्रकल्पावर भर देणे आवश्यक आहे,असे त्यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या काही घटनांचा उल्लेख करत सुरक्षेच्या नव्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सजगता आणि सतर्कतेचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. कृत्रिम बुद्धीमत्ता आणि परिवर्तनासाठी स्वयंचलन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली, ज्यायोगे कोणत्याही परिस्थितीसाठी भारतीय हवाई दल नेहमीच सज्ज आहे याची सुनिश्चिती राहील.
भविष्यातही मेन्टेनन्स कमांड,एकीकृत कार्यासाठी देखभाल आणि लॉजिस्टिक साठी साधन संपन्न संस्था म्हणून कार्यरत राहावी यासाठीच्या आपल्या प्रयत्नात स्वदेशी आणि आधुनिकीकरणाचा मंत्र बिंबवून घ्यावा असे आवाहन त्यांनी कमांडर्सना केले.
***
MI/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1745382)
Visitor Counter : 340