श्रम आणि रोजगार मंत्रालय
पंतप्रधान श्रम पुरस्कार घोषित
एकूण पुरस्कारप्राप्त कामगारांपैकी, 49 कामगार सार्वजनिक तर 20 कामगार खाजगी क्षेत्रातील
Posted On:
12 AUG 2021 7:39PM by PIB Mumbai
भारत सरकारने आज वर्ष- 2018 साठीच्या पंतप्रधान श्रम पुरस्कारांची घोषणा केली. हे पुरस्कार केंद्र आणि राज्य सरकारांच्या विभागीय उपक्रमातील आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील तसेच पाचशे किंवा त्याहून जास्त कर्मचारी असणाऱ्या खाजगी क्षेत्रातील विभागांमधील एकूण 69 कामगारांना जाहीर करण्यात आले आहेत. कामगारांची विशेष कामगिरी, अनोखी कार्यक्षमता, उत्पादनाच्या क्षेत्रात लक्षणीय सहभाग त्याशिवाय असाधारण धैर्य आणि प्रसंगावधान या बाबीं विचारात घेऊन हे पुरस्कार देण्यात येतात.
यावर्षी पंतप्रधान श्रम पुरस्कार तीन श्रेणीत देण्यात आले आहेत. यापैकी श्रमभूषण पुरस्कार हे प्रत्येकी 1,00,000/- रुपयांचे रोख पारितोषिक आहे. श्रमवीर किंवा श्रम वीरांगना पुरस्कार हे प्रत्येकी 60,000/- रुपयांचे रोख पारितोषिक आहे तर श्रमश्री/ श्रमदेवी पुरस्कार हे प्रत्येकी 40,000/- रुपयांचे रोख पारितोषिक आहे.
2018 या वर्षासाठी श्रमभूषण पुरस्कारासाठी 4 नामनिर्देशने तर श्रमवीर /श्रमवीरांगणा पुरस्कारासाठी 12 नामनिर्देश व श्रमश्री/श्रमदेवी पुरस्कारासाठी 17 नामनिर्देशित व्यक्तींची निवड झाली आहे . पुरस्कार प्राप्त कामगारांची एकूण संख्या 69 असून या वर्षी एकूण 33 श्रम पुरस्कार देण्यात येत आहेत.काही पुरस्कार कामगारांमध्ये विभागून दिले गेले आहेत किंवा एकापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या चमूला मिळाले आहेत. यामुळे यावर्षीच्या पारितोषिक प्राप्त कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 69 आहे. एकूण पारितोषिक प्राप्त कामगारांपैकी 49 कामगार सार्वजनिक क्षेत्रातील तर 20 कामगार खाजगी क्षेत्रातील आहेत. पुरस्कार प्राप्त कामगारांमध्ये आठ महिला कामगार आहेत. पारितोषकप्राप्त कामगारांची सविस्तर माहिती इथे पाहता येईल .
***
M.Chopade/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1745251)
Visitor Counter : 349