आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडून जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण, (GYTS-4) इंडिया 2019 राष्ट्रीय फॅक्टशीटचे अनावरण


गेल्या दशकभरात 13 ते 15 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण 42%ने घटले

तंबाखू सेवनाचे प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये अधिक

Posted On: 10 AUG 2021 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2021

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी आज जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण, (GYTS-4) इंडिया 2019 राष्ट्रीय फॅक्टशीटचे अनावरण केले. यावेळी सर्वेक्षणातील महत्त्वाच्या निष्कर्षांकडे मंत्री महोदयांनी लक्ष वेधले.

तंबाखूसेवन

  • 13 ते 15 वयोगटातील जवळपास एक पंचमांश विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात ( तंबाखू ओढणे , धूर विरहित किंवा इतर  ) कोणत्या ना कोणत्या प्रकारे तंबाखूचे सेवन केलेले आहे.  सध्या (गेल्या तीस दिवसात) तंबाखूच्या सेवनाचे प्रमाण 8.5% आहे. तंबाखू सेवनाचे प्रमाण 42 टक्केनी घटल्याचे गेल्या दोन सर्वेक्षणांमधून (2009-2019) लक्षात  आले आहे.
  • मुलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण 9.6 टक्के तर मुलींमध्ये तेच प्रमाण 7.4 टक्के आहे.
  • तंबाखू ओढण्याचे प्रमाण 7.3 टक्के आहे, तर धूरविरहीत तंबाखू सेवनाचे प्रमाण 4.1 टक्के आहे.
  • विद्यार्थ्यांमध्ये ई - सिगारेट वापराचे प्रमाण 2.8 टक्के होते.
  • कोणत्याही प्रकारातील तंबाखूच्या वापराचे प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये अधिक होते.
  • विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यार्थ्यांच्या तंबाखू सेवनाच्या प्रमाणाचा वेध घेतल्यास ते प्रमाण अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यात  सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 58 टक्के आहे , तर हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात ते सर्वात कमी म्हणजे अनुक्रमे 1.1 टक्के आणि 1.2 टक्के एवढे आहे.

तंबाखूची ओळख होण्याचे व

  • सिगारेट ओढणाऱ्यांपैकी 38% जणांनाबिडी ओढणाऱ्यांपैकी 47 टक्कें जणांना  आणि  धूर विरहित तंबाखू सेवन करणाऱ्यांपैकी 52 टक्कें जणांना  संबंधित व्यसनप्रकाराची ओळख त्यांच्या वयाच्या दहा वर्षांच्या आतच झालेली असते. सर्वसाधारणपणे 11.5 वर्षे 10.5 वर्षे आणि 9.9  वर्षे या वयात अनुक्रमे सिगारेट बिडी आणि धूर विरहित तंबाखूसेवन याची सवय  लागल्याचे आढळले आहे.

प्रसार माध्यमे आणि तंबाखू सेवन विरोधी संदेश

  • प्रसार माध्यमांमधील तंबाखू सेवन विरोधी संदेशाची दखल 52 टक्के विद्यार्थ्यांकडून घेतली जाते.
  • 18 टक्के विद्यार्थी विक्रीच्या ठिकाणी असलेल्या तंबाखूच्या जाहिराती किंवा त्यासंबंधीचे संदेश यांची दखल घेतात.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1744613) Visitor Counter : 333


Read this release in: English , Urdu , Hindi