PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

प्रविष्टि तिथि: 10 AUG 2021 8:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 10 ऑगस्ट 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

गेल्या 24 तासात भारतामध्ये 28,204 नवीन रुग्णांची नोंद, गेल्या 147 दिवसांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,88,508; गेल्या 139 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या

उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णसंख्येच्या 1.21%; मार्च 2020 पासून सर्वात कमी

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.45% असून आतापर्यंतचा हा सर्वात अधिक कोविडमुक्तीचा दर आहे

देशभरात आतापर्यंत 3,11,80,968 रुग्ण कोविडमुक्त झाले

गेल्या 24 तासांमध्ये 41,511 रुग्ण कोविडमुक्त झाले

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 51.45 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी असून हा दर सध्या 2.36%

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.87% असून, हा दर गेल्या 15 दिवसांपासून 3% पेक्षा कमी

चाचणी क्षमतेमध्ये उल्लेखनीय वाढ - एकूण 48.32 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत

इतर अपडेट्स :

केंद्र सरकारने आतापर्यंत 52.56 (52,56,35,710) कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. 48,43,100 लसींच्या मात्रा पुरवठा प्रक्रियेत आहेत. आज सकाळी 8 वाजता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून 51,09,58,562 मात्रा वापरल्या गेल्या आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे अजूनही 2.07 (2,07,55,852) कोटींपेक्षा अधिक मात्रांचा साठा उपलब्ध आहे.

M.Chopade/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1744592) आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Punjabi , Gujarati