अवजड उद्योग मंत्रालय

देशभरात गेल्या तीन वर्षात एकूण 5,17,322 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी


ई- दुचाकी, ई- तिचाकी आणि ई- चारचाकी वाहनांचे उत्पादन करणाऱ्या 38 ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सची (ओईएम) फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नोंदणी

Posted On: 10 AUG 2021 5:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2021

देशात इलेक्ट्रिक/हायब्रीड वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालयाने फेम इंडिया अर्थात फास्टर ऍडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड ऍन्ड इलेक्ट्रिक व्हेईकल्स ही योजना 2015 मध्ये सुरू केली होती. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची एक एप्रिल 2019 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी अंमलबजावणी सुरू आहे आणि त्यासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या टप्प्यात सार्वजनिक आणि शेअर पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या वाहतुकीच्या साधनांचे विद्युतीकरण आणि 7090 ई-बसेस, 5 लाख ई- तिचाकी, 55,000 ई- चारचाकी प्रवासी वाहने आणि 10 लाख ई- दुचाकी यांना अनुदानाचे पाठबळ देण्यावर भर दिला जात आहे. ई- दुचाकी, ई- तिचाकी आणि ई- चारचाकी वाहनांचे उत्पादन करणाऱ्या 38 ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सची (ओईएम) फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 9 ऑगस्ट 2021 पर्यंत नोंदणी झाली आहे. या वाहनांचे उत्पादक/मूळ सामग्री उत्पादक यांचे तपशील सोबतच्या तक्त्यात दिले आहेत.

Sl. No.

Year

No. of electric vehicles

1.

2018

1,31,554

2.

2019

1,61,314

3.

2020

1,19,648

4.

2021 (till 19th July, 2021)

1,04,806

Total

5,17,322

रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षात नोंदणी झालेल्या या इलेक्ट्रिक वाहनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Category

Name of Manufacturers

e-2W

1

Ampere Vehicle Pvt. Ltd.

2

Ather Energy Pvt. Ltd.

3

Benling India Energy & Technology Pvt. Ltd.

4

Hero Electric Vehicles Pvt. Ltd.

5

Jitendra EV Tech Pvt. Ltd.

6

Li-ions Elecktrik Solutions Pvt. Ltd.

7

Okinawa Auto Tech Pvt. Ltd.

8

Revolt Intellicorp Pvt. Ltd.

9

TVS Motor Company Ltd.

10

M/s. Tunwal E-motors Pvt. Ltd

e-3W

1

Champion Polyplast

2

Kinetic Green Energy and Power Solution Ltd.

3

Mahindra Electric Mobility Ltd.

4

Victory Electric Vehicles Intl. Pvt. Ltd.

5

YC Electric Vehicle Pvt. Ltd

6

Best Way Agencies Pvt. Ltd.

7

Energy Electric Vehicles

8

Thukral Electric Bikes Pvt. Ltd

9

M/S Saera Electri Auto Pvt. Ltd

10

Khalsa Agency

11

Goenka Electric Motor Vehicles Pvt. Ltd.

12

Atul Auto Ltd.

13

Dilli Electric Auto Pvt. Ltd

14

U P Telelinks Ltd

15

Piaggio Vehicles Pvt. Ltd.

16

Lohia Auto Industries

17

Avon Cycles Ltd.

18

Altigreen Propulsion Labs Pvt. Ltd.

19

Keto Motors Pvt. Ltd.

20

Omega Seiki Pvt. Ltd.

21

Speego Vehicles Co. Pvt. Ltd.

22

Etrio Automobiles Private Ltd.

23

Grd Motors

24

Om Balajee Automobile India Pvt Ltd

25

Scooters India Limited

26

Mlr Auto Ltd

e-4W

1

Mahindra & Mahindra

2

Tata Motors

अवजड उद्योग राज्यमंत्री क्रिशन पाल गुर्जर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1744487) Visitor Counter : 287


Read this release in: English , Urdu , Punjabi , Tamil