उपराष्ट्रपती कार्यालय

छोडो भारत चळवळ दिनानिमित्त उपराष्ट्रपतींकडून शुभेच्छा

Posted On: 08 AUG 2021 5:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2021

उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांनी छोडो भारत चळवळ दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात उपराष्ट्रपती म्हणतात-

छोडो भारत चळवळ दिनानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा. गांधीजींनी देशवासियांना दिलेल्या ‘करा किंवा मरा’ संदेशाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नवी ऊर्जा भरली आणि ब्रिटीशांना 1947 मध्ये भारत सोडून जाण्यास भाग पाडले.

याप्रसंगी आपण भारताच्या अनेक वीर पुत्रांचे आणि कन्यांचे स्मरण करु. आज, देशातून आपण दारिद्रय, निरक्षरता, असमानता, भ्रष्टाचार आणि जातीयवाद, वर्णवाद आणि लिंगभेदाचे उच्चाटन करु.

आपल्या आयुष्यात ‘भारतीयत्व’ पुन्हा परत आणू- जे मातृभाषा, वेशभूषा आणि भारतीय परंपरांमध्ये आहे.

चला सर्व मिळून सर्वसमावेशी, आत्मविश्वासपूर्ण आत्मनिर्भर भारताची उभारणी करु. जय हिंद!

 

S.Thakur/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1743829) Visitor Counter : 283