PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
07 AUG 2021 4:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 7 ऑगस्ट 2021
#Unite2FightCorona#IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार एकूण 58,08,344 सत्रांमध्ये, 50,10,09,609 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 49,55,138 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
यात समावेश आहे :
HCWs
|
1st Dose
|
1,03,28,986
|
2nd Dose
|
79,53,278
|
FLWs
|
1st Dose
|
1,82,06,470
|
2nd Dose
|
1,16,55,584
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
17,26,01,639
|
2nd Dose
|
1,12,87,774
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
11,08,54,315
|
2nd Dose
|
4,19,57,311
|
Over 60 years
|
1st Dose
|
7,80,50,150
|
2nd Dose
|
3,81,14,102
|
Total
|
50,10,09,609
|
कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.
भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 3,10,55,861 तर गेल्या 24 तासात 40,017 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा कल सातत्याने सकारात्मक असून आता रुग्ण बरे होण्याचा एकूण दर 97.37% झाला आहे.
भारतात गेल्या 24 तासात 38,628 नव्या रुग्णांची नोंद झाली.
सलग 41 दिवस 50,000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे.
भारतात सक्रीय रुग्णसंखेतही सातत्याने घट होत आहे. देशात आज सक्रीय रुग्णसंख्या 4,12,153 इतकी असून ती एकूण रुग्णसंख्येच्या 1.29% आहे.
चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 17,50,081 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 47.83 कोटींपेक्षा अधिक (47,83,16,964) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दरात घट कायम आहे. सध्या साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दर 2.39% तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.21% आहे. गेल्या 12 दिवसांपासून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 3% पेक्षा कमी तर सलग 61 व्या दिवशी 5% पेक्षा कमी आहे.
इतर अपडेटस्
- देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा देत केंद्र सरकार सहकार्य करत आहे. केन्द्र सरकार कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्यात देशातील लस उत्पादकांकडून 75 टक्के लसींची खरेदी करेल, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना त्याचा मोफत पुरवठा केला जाईल. केंद्र सरकारने आतापर्यंत 51.66 (51,66,13,680) कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. 55,52,070 मात्रा पुरवठा प्रक्रियेत आहेत. आज सकाळी 8 वाजता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून 49,74,90,815 मात्रा वापरल्या गेल्या आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे अजूनही 2.29 कोटींपेक्षा अधिक (2,29,36,394) मात्रांचा साठा उपलब्ध आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मध्यप्रदेशातील लाभार्थ्यांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेविषयी अधिक जनजागृती करण्यासाठी एक मोहीम सध्या सरकारतर्फे चालवली जात आहे. एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी, राज्यसरकार ही मोहीम राबवत आहे. मध्यप्रदेशात सात ऑगस्ट हा दिवस प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना दिवस म्हणून साजरा केला जातो. मध्यप्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. मध्यपरदेशात सुमार पाच कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
Important Tweets
***
Jaydevi PS/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1743677)
Visitor Counter : 228