नागरी उड्डाण मंत्रालय

भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण विधेयक 2021 संसदेत मंजूर


या विधेयकाने 'प्रमुख विमानतळ' च्या व्याख्येत सुधारणा केल्याने 'विमानतळांच्या गटाचे' दर निश्चित करण्यास परवानगी

लहान विमानतळांच्या विकासासाठी प्रोत्साहन देणारे विधेयक

Posted On: 04 AUG 2021 9:43PM by PIB Mumbai

राज्यसभेत मंजूर झाल्यावर, भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, 2021 ला आज संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाली. यापूर्वी 29 जुलै रोजी हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.

 

आज संसदेत विधेयक मंजूर झाल्यानंतर श्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी विधेयकाला दिलेल्या मौल्यवान अभिप्रायासाठी आणि पाठिंब्याबद्दल खासदारांचे आभार मानले आणि ते म्हणाले, "हे विधेयक लहान विमानतळांच्या विकासासाठी महत्वाचे ठरेल आणि दूरवरच्या भागात हवाई संपर्क वाढवण्यास मदत करेल.''

हे विधेयक 'प्रमुख विमानतळ' च्या व्याख्येत सुधारणा करून' विमानतळांच्या गटाचे 'दर निश्चित करण्यासाठी  परवानगी देते. या विधेयकामुळे एकल विमानतळांसाठीच्या शुल्कासंबंधित कायद्यातील तरतुदींमध्ये सुधारणा होणार आहे. सरकारचा हेतू मोठ्या प्रमाणात रहदारी आणि फायदेशीर विमानतळे विकसित करणे हाच केवळ  नाही तर रहदारी कमी असलेली आणि कमी   -लाभदायक विमानतळांचा विकास करणे हा सुद्धा आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने  या विमानतळांमधून मिळवलेला महसूल श्रेणी -2 आणि श्रेणी  -3 शहरांमधील विमानतळांच्या विकासासाठी वापरला जाईल.यामुळे लहान विमानतळांच्या विकासाला  प्रोत्साहन मिळेल.हा दृष्टिकोन सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून अधिक विमानतळांच्या विकासाला साहाय्यक  ठरेल. ज्यामुळे तुलनेने दुर्गम आणि दूरच्या भागात हवाई संपर्क वाढेल. 

***

MC/Sonal/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1742611) Visitor Counter : 304


Read this release in: English , Urdu , Hindi