नौवहन मंत्रालय

विद्यमान देशांतर्गत जहाज कायदा 1917 रद्द करण्यासाठी आणि बदलण्यासाठी संसदेने देशांतर्गत जहाज विधेयक 2021 मंजूर केले

प्रविष्टि तिथि: 02 AUG 2021 8:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2021 

 

संसदेने आज देशांतर्गत जहाजे विधेयक, 2021 मंजूर केले. 100 वर्षांहून अधिक जुना देशांतर्गत जहाज कायदा  1917 बदलणे आणि देशांतर्गत जलवाहतूक क्षेत्रात नवीन युगाची सुरुवात करणे आणि कायद्याची  चौकट वापरण्यास अनुकूल बनवण्यासाठी आणि व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  स्वप्न पूर्ण करणे हे याचे उद्दिष्ट आहे. बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री  सर्वानंद सोनोवाल यांनी आज राज्यसभेत विधेयक मांडले होते. आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी  पाठवले जाईल.

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, वसाहतवादी कायदे रद्द करून त्याजागी आधुनिक आणि समकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सागरी क्षेत्राच्या विकासासाठी कायदे करणे हा मंत्रालयाच्या सक्रिय दृष्टिकोनाचा एक भाग आहे.  सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले की नियम आणि नियमांची एकसमान अंमलबजावणी देशांतर्गत जलमार्गाच्या वापरातून देशांतर्गत जहाजांद्वारे वेगवान , सुरक्षित आणि स्वस्त व्यापार आणि वाहतूक सुनिश्चित करेल.

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1741674) आगंतुक पटल : 334
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Bengali , Punjabi