आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – 19 लसीकरणसंदर्भात अद्ययावत माहिती
राज्य/केंद्रशासित प्रदेशांना 49.64 कोटींपेक्षा अधिक लसीकरणाच्या मात्रा पुरविण्यात आल्या
राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे 3.14 कोटींपेक्षा अधिक लसींच्या मात्रा उपलब्ध
प्रविष्टि तिथि:
02 AUG 2021 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2021
कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाची व्याप्ती आणि गती देशभरात वाढविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. कोविड – 19 प्रतिबंधक सार्वत्रिक लसीकरणाचा नवीन टप्पा 21 जून 2021 पासून सुरू झाला. लसींची अधिक प्रमाणातील उपलब्धता, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लसीची उपलब्धता, यावर पूर्वीपासूनच लक्ष ठेवून आणि प्रवाही लस पुरवठा साखळी या माध्यमातून लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्यात आली आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांचा पुरवठा मोफत करीत आहे. कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्प्यात केंद्र सरकार, देशातील लस उत्पादकांकडून उत्पादित केलेल्या 75% लसी खरेदी करून त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरविणार आहे.
|
VACCINE DOSES
|
(As on 2 August 2021)
|
|
SUPPLIED
|
49,64,98,050
|
|
IN PIPELINE
|
9,84,610
|
|
BALANCE AVAILABLE
|
3,14,34,654
|
सर्व स्रोतांच्या माध्यमातून आतापर्यंत 49.64 कोटींपेक्षा अधिक (49,64,98,050) लसीच्या मात्रा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना पुरविण्यात आल्या आहेत आणि आणखी 9,84,610 मात्रा पुरविल्या जाणार आहेत.
याखेरीज राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे लसीच्या 3.14 कोटींपेक्षा जास्त (3,14,34,654) शिल्लक आणि न वापरलेल्या मात्रा शिल्लक आहेत.
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1741517)
आगंतुक पटल : 289