रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
कनेक्टिव्हिटी, आंतर-प्राधान्य आणि निधीची उपलब्धता याच्या आधारे राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गामध्ये उन्नतीकरण
Posted On:
02 AUG 2021 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2021
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची जबाबदारी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची आहे. तर राज्य महामार्ग ही राज्यांची जबाबदारी आहे. मात्र आंध्र प्रदेश राज्य सरकारसह विविध राज्य सरकारे / केंद्रशासित प्रदेश (UTs) इत्यादींनी राज्य महामार्गासह राज्यातील रस्ते नवीन राष्ट्रीय महामार्ग म्हणून राज्य रस्ते घोषित करण्यासाठी मंत्रालयाशी संपर्क साधला. कनेक्टिव्हिटी, आंतर - प्राधान्य आणि निधीची उपलब्धता यानुसार मंत्रालय वेळोवेळी राज्य महामार्गासह राज्यातील रस्ते नवीन राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याचा विचार करते.
नव्याने घोषित केलेल्या राष्ट्रीय महामार्गांसह अधिसूचित राष्ट्रीय महामार्गांवरील कामे आंतर-प्राधान्य, चालू असलेल्या कामांची प्रगती, निधीची उपलब्धता आणि रहदारीच्या प्रमाणानुसार हाती घेतली जातात. यासाठी स्वतंत्रपणे कोणतीही आर्थिक तरतूद केली जात नाही आणि जेव्हा मंजुरी मिळते तेव्हा विद्यमान अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार काम केले जाते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1741502)
Visitor Counter : 180