संरक्षण मंत्रालय

व्हाईस अ‍ॅडमिरल एस एन घोरमाडे, एव्हीएसएम, एनएम यांनी नौदल उप-प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

Posted On: 31 JUL 2021 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जुलै 2021

 

व्हाईस अ‍ॅडमिरल एस एन घोरमाडे, एव्हीएसएम, एनएम यांनी आज सकाळी साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली येथे आयोजित एका औपचारिक समारंभात व्हाईस अ‍ॅडमिरल जी. अशोक कुमार, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी यांच्याकडून नौदल उप-प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. 

व्हाईस  अ‍ॅडमिरल एन. घोरमाडे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), खडकवासला, युनायटेड स्टेट्स नेव्हल वॉर कॉलेज, न्यूपोर्ट, रोड आयलंड, आणि नेव्हल वॉर कॉलेज, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत.

भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौकांवर त्यांनी अनेक वर्षे सेवा बजावली. 37 वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांच्या  असंख्य  नेमणुका झाल्या. त्यांच्या महत्त्वाच्या परिचालन  नेमणुकांमध्ये कमांड्स ऑफ गाइडेड मिसाइल फ्रिगेट आयएनएस ब्रह्मपुत्र, पाणबुडी बचाव जहाज आयएनएस निरीक्षक, आणि माईनस्वीपर आयएनएस अलेप्पी आणि गाइडेड मिसाइल फ्रिगेट आयएनएस गंगाचे सेकंड इन कमांड यांचा समावेश आहे. त्यांच्या कमांड दरम्यान आयएनएस निरीक्षकला   प्रथमच युनिट प्रशस्तिपत्र देण्यात आले.

त्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून 26 जानेवारी 17 रोजी अति विशिष्ट सेवा पदक आणि 2007 मध्ये नौसेना पदक  आणि 2000 मध्ये नौदलप्रमुखांकडून कमेंडेशन देऊन गौरवण्यात आले.  त्यांनी व्हाईस  अ‍ॅडमिरल जी. अशोक कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला. ते 39 वर्षापेक्षा  अधिक काळाच्या सेवेनंतर  31 जुलै 21 रोजी निवृत्त झाले.

* * *

S.Thakur/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1741055) Visitor Counter : 362