गृह मंत्रालय
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा राज्यशासन स्थापित करण्याचा प्रस्ताव
Posted On:
28 JUL 2021 7:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2021
जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य झाल्यावर योग्य वेळी जम्मू-काश्मीरमध्ये राज्यशासन मंजूर केले जाईल.
घटनात्मक बदल आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने जम्मू-काश्मीर राज्याचे जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख केंद्रशासित प्रदेशात विभाजन आणि जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेच्या हिताच्या दृष्टीने, जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट आणि मोबाइल सेवा सारख्या विविध दूरसंचार वाहिन्यांवर तात्पुरते निर्बंध लावले गेले.
त्यानंतर वेळोवेळी या प्रकरणाचा आढावा घेण्यात आला आणि लागू केलेले निर्बंध हळूहळू टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले आणि 05.02.2021 पासून जम्मू-काश्मीरच्या संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात 4 जी इंटरनेट डेटा सेवा पूर्ववत करण्यात आली.
गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
M.Iyengar/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1740014)
Visitor Counter : 215