कंपनी व्यवहार मंत्रालय

वर्ष 2018 ते 2021 या काळात देशात 2,38,223 बनावट कंपन्या असल्याचे सरकारच्या तपासणीत निष्पन्न

Posted On: 27 JUL 2021 8:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जुलै 2021

कंपनी कायद्यात, ‘शेल कंपनी’ म्हणजेच बनावट कंपनीची कुठलीही निश्चित व्याख्या नमूद करण्यात आलेली नाही. साधारणपणे ही संज्ञा, कोणतेही व्यावसायिक काम करत नसलेल्या किंवा काही महत्वाची मालमत्ता नसलेल्या कंपन्यांसाठी वापरली जाते. काही वेळा, अशा कंपन्यांचा वापर काही अवैध कामांसाठी, म्हणजेच, करचोरी, मनी लौंडरीग, संदिग्ध मालकी, बेनामी संपत्ती अशा सर्व गैरव्यवहारांसाठी केला जातो. अशी माहिती, केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी राज्यसभेत दिली.

केंद्र सरकारने  या मुद्यावर अध्ययन करण्यासाठी  विशेष कृती दलाची स्थापना केली होती. या दलाने, अशा कंपन्या ओळखण्यासाठी काही निश्चित धोक्याची सूचना देणाऱ्या निर्देशकांचा वापर करावा अशी शिफारस केली होती.

अशा बनावट कंपन्या शोधून काढण्यासाठी केंद्र सरकारने गेली तीन वर्षे विशेष मोहीम हाती घेतली होती. 

यावेळी मंत्र्यानी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील अशा बनावट कंपन्यांची यादी सभागृहात पटलावर ठेवली. यानुसार, महाराष्ट्रात, कंपनी प्रबंधक कार्यालयाच्या (RoC) नोंदणीनुसार मुंबईत 52869 बनावट कंपन्या आणि पुण्यात 5552 कंपन्या सापडल्या.

Name of the State/ UT

No. of Struck off Companies

2018 to June 2021

RoC-Ahmedabad

9243

RoC-Andaman

41

RoC-Bangalore

11185

RoC-Chandigarh

4908

RoC-Chennai

11217

RoC-Chhattisgarh

947

RoC-Coimbatore

2992

RoC-Cuttack

3731

RoC-Delhi

45595

RoC-Ernakulam

9189

RoC-Goa

597

RoC-Gwalior

4920

RoC-HimachalPradesh

858

RoC-Hyderabad

20488

RoC-Jaipur

9222

RoC-Jammu

393

RoC-Jharkhand

1848

RoC-Kanpur

15803

RoC-Kolkata

15022

RoC-Mumbai

52869

RoC-Patna

4683

RoC-Pondicherry

191

RoC-Pune

5552

RoC-Shillong

1256

RoC-Uttarakhand

555

RoC-Vijayawada

4918

Total

238223

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739667) Visitor Counter : 206


Read this release in: Tamil , English , Punjabi , Telugu