अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय

नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ फूड टेक्नॉलॉजी, एंटरप्रेनरशिप अँड मॅनेजमेंट 2021 हा कायदा संसदेत मंजूर


याद्वारे हरियाणातील NIFTEM व तामिळनाडूतील IIFPT या संस्थांना राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था दर्जा

Posted On: 26 JUL 2021 10:30PM by PIB Mumbai

 

नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ फूड टेक्नॉलॉजी, एंटरप्रेनरशिप अँड मॅनेजमेंट 2021 हा कायदा संसदेने मंजूर केला. राज्यसभेने यावर्षी 15 मार्च रोजी मंजूर केलेले हे विधेयक आज लोकसभेत बिनविरोध मंजूर झाले.

संसदेत मंजूर झालेल्या या कायद्याबद्दल सांगताना केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांनी सांगितले की, हे विधेयक मंजूर झालेला आजचा ऐतिहासिक दिवस आहे. यामुळे हरियाणातील कुंडली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रेनरशिप व मॅनेजमेंट (NIFTEM) व तामिळनाडूतील तंजावूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी (IIFPT) या आपल्या देशातील, अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील दोन  शिक्षणसंस्थांना राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था हा दर्जा मिळाला आहे.

या संस्थांमधील अन्न प्रक्रिया क्षेत्राशी संबधित म्हणजे शीतगृह तंत्रज्ञान, अन्न जैव सुक्ष्मतंत्रज्ञान अश्या अभ्यासक्रमांमुळे तंत्रज्ञान विषयक दरी कमी होण्यास मदत होईल. आता या संस्था देशात तसेच परदेशात कोठेही आपली शिक्षणकेंद्रे उभारू शकतील. असेही मंत्रीमहोदयांनी स्पष्ट केले.

***

M.Chopade/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739283) Visitor Counter : 252


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi