अर्थ मंत्रालय
प्राप्तिकर विभागाने विविध व्यवसाय असलेल्या एका प्रमुख समूहाच्या देशभरातील कार्यालयांवर टाकले छापे
Posted On:
24 JUL 2021 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2021
प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 132 अन्वये 22.07.2021 रोजी एक प्रमुख व्यावसायिक समूहावर छापे टाकले . या समूहाचा माध्यमे, वीज, वस्त्रोद्योग आणि गृहनिर्माणसह विविध क्षेत्रातील व्यवसायांमध्ये सहभाग होता आणि वार्षिक उलाढाल 6,000 कोटी रुपये होती. मुंबई, दिल्ली, भोपाळ, इंदूर, नोएडा आणि अहमदाबाद यासह 9 शहरांमध्ये त्याची 20 निवासी संकुले आणि 12 व्यवसाय कार्यालये आहेत.
या समूहाच्या होल्डिंग आणि सहाय्यक कंपन्यांसह 100 हून अधिक कंपन्या आहेत. शोध मोहिमेत असे आढळले की ते आपल्या कर्मचार्यांच्या नावावर अनेक कंपन्या चालवत आहेत आणि त्यातून बोगस खर्च व निधी दाखवला जातो. यावेळी , अनेक कर्मचारी, ज्यांची नावे भागधारक आणि संचालक म्हणून वापरली गेली होती, त्यांनी कबूल केले आहे की त्यांना अशा कंपन्यांविषयी माहिती नाही आणि त्यांचे आधार कार्ड आणि डिजिटल स्वाक्षरी त्यांनी मालकाना चांगल्या हेतूने दिली होती. अन्य काहीजण नातेवाईक असल्याचे आढळले, ज्यांनी स्वेच्छेने आणि जाणूनबुजून कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती परंतु त्यांना व्यवसायाविषयी काही माहिती किंवा व्यवसायावर त्यांचे नियंत्रण नव्हते.
ही पद्धत वापरून आतापर्यंत 6 वर्षांच्या कालावधीत 700 कोटी रुपयांचे उत्पन्न लपवण्यात आले.
या व्यतिरिक्त, यामध्ये कंपनी कायद्याच्या S.2(76)(vi) आणि सूचीबद्ध कंपन्यांसाठी सेबीने विहित केलेल्या लिस्टिंग कराराच्या कलम 49 चे उल्लंघन केले आहे. याची बेनामी व्यवहार निषेध कायद्याच्या वापराचीही तपासणी केली जाईल.
संबंधित नसलेल्या व्यवसायात गुंतलेल्या गट कंपन्यांमध्ये 2,200 कोटी रुपये हस्तांतरित केल्याचे आढळले आहे. कर परिणाम आणि इतर कायद्यांचे उल्लंघन याचीही तपासणी केली जात आहे.
मॉल चालविणार्या समूहाच्या रिअल इस्टेट कंपनीला राष्ट्रीयकृत बँकेकडून 597 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. त्यापैकी 408 कोटी रुपये सहाय्यक कंपनीला 1%. इतक्या कमी व्याजदराने कर्ज म्हणून वळवले गेले आहेत.
समूहाच्या प्रवर्तक व प्रमुख कर्मचाऱ्यांच्या निवासी आवारात एकूण 26 लॉकर आढळले आहेत.
शोध मोहिमेदरम्यान सापडलेल्या विविध सामग्रीची तपासणी केली जात आहे.
छापे सत्र अजून सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1738713)
Visitor Counter : 303