रेल्वे मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        बुलेट ट्रेन प्रकल्पांसाठी, अंतिम ठिकाण सर्वेक्षण, भौगोलिक तांत्रिक तपासणी पूर्ण आणि संरेखनाला अंतिम रूप
                    
                    
                        
वन्यजीव, किनारा नियमन क्षेत्र  (सीआरझेड) संबंधित वैधानिक मंजुरी आणि वन विभागाची मंजुरी प्राप्त
                    
                
                
                    Posted On:
                23 JUL 2021 5:12PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
सध्या मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (एमएएचएसआर) हा प्रकल्प देशातील  हाय स्पीड रेलचा  एकमेव मंजूर प्रकल्प असून तो जपान सरकारच्या आर्थिक आणि तांत्रिक मदतीने राबवला जात आहे. हा प्रकल्प राबवण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) या नावाने एक विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) स्थापन केले  आहे.
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (एमएएचएसआर) प्रकल्पाची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहेः
अंतिम ठिकाण  सर्वेक्षण आणि भौगोलिक तपासणी पूर्ण झाली. संरेखनाला अंतिम रूप देण्यात आले.
वन्यजीव, किनारा नियमन क्षेत्र  (सीआरझेड) संबंधित वैधानिक मंजुरी आणि वन विभागाची मंजुरी   प्राप्त झाली.
अंदाजे एकूण 1396 हेक्टर जमीनीपैकी.  1046  हेक्टर जमिनीसाठी  संमती करारावर स्वाक्षरी. 1651 पैकी 1342 सेवा स्थानांतरित करण्यात आल्या.
प्रकल्पाचे संपूर्ण काम वडोदरा येथील प्रशिक्षण संस्थेसह 27 कंत्राटी पॅकेजेसमध्ये विभागले  आहे. सध्या 7 पॅकेजेस देण्यात आली असून आणखी 10 आमंत्रित करण्यात आली आहेत.
जून, 2021  पर्यंत एमएएचएसआर प्रकल्पावरील एकूण खर्च अंदाजे 13,483 कोटी रुपये आहे, जो मुख्यत: भूसंपादन, सेवा स्थानांतरण आणि कंत्राटी पेमेंटवरचा आहे.  कोविड-19 महामारीचा  प्रतिकूल परिणाम आणि महाराष्ट्र राज्यात जमीन अधिग्रहणाबाबत मंद गतीने प्रगती झाल्यामुळे  या प्रकल्पाला  विलंब झाला आहे.
तसेच, रेल्वे मंत्रालयाने नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (एनएचएसआरसीएल) सात हाय-स्पीड रेल कॉरिडोर्सचे  (एनएचएसआरसीएल)  सर्वेक्षण व तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम दिले आहे . यात  चेन्नई-बंगळुरू -म्हैसूर आणि मुंबई -पुणे-हैदराबाद मार्ग यांचा समावेश असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या  लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
M.Chopade/S.Kane/P.Kor
*** 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1738362)
                Visitor Counter : 206