रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

वाहनांसाठीचे इंधन म्हणून गॅसोलीनमध्ये 12 % आणि 15 %इथेनॉल मिश्रणाचा वापर केला सुलभ

Posted On: 22 JUL 2021 2:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2021

ऑटोमोटीव्ह अर्थात वाहनांसाठीचे इंधन म्हणून गॅसोलीनमध्ये 12 % आणि 15 %इथेनॉल मिश्रणाचा वापर  सुलभ करणारा जी एस आर 439(ई)28-06-2021,अधिसूचित केला असून संबंधीतांकडून  सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत.प्रदूषण कमी करण्यासाठी आणि आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी, पेट्रोलमध्ये 20 %इथेनॉल मिश्रण साध्य करण्याची नियोजित तारीख आता  पाच वर्षे  आधी म्हणजे 2025 हे वर्ष  करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. इथेनॉल मिश्रण करणारा भारत 2020-25 यासाठी नीती आयोगाने पथदर्शी आराखडा तयार केला आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा आणि पर्यायी इंधन वापरणाऱ्या वाहनांना सरकार प्रोत्साहन देत असल्याचेही या उत्तरात म्हटले आहे.

 

Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1737685) Visitor Counter : 190


Read this release in: English , Urdu , Bengali