राष्ट्रपती कार्यालय

ईद-उझ-जुहाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

Posted On: 20 JUL 2021 7:25PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ईद-उझ-जुहाच्या पूर्वसंध्येला नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, ईद-उझ -जुहाच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना, विशेषत: आमच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो.

ईद-उझ-जुहा हा प्रेम, निस्वार्थीपणा आणि त्याग या भावनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि सर्वसमावेशक समाजात ऐक्य आणि बंधुत्वासाठी  एकत्रितपणे काम करण्याचा उत्सव आहे.

ईदचा उत्सव हा आपला आनंद सामायिक करण्याची आणि गरीब आणि निराधार लोकांना मदत करण्याची संधी देखील आहे.

कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांचा अवलंब करून लढा देण्याचा आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या आनंद व कल्याणासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा:

***

M.Chopade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1737318) Visitor Counter : 198