आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत देण्यात आलेल्या निधीचा उपयोग

Posted On: 20 JUL 2021 4:55PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरवात झाल्यापासून त्या अंतर्गत सन 2013-14 ते  2020-21 दरम्यान राज्य / केंद्रशासित प्रदेशांना दिलेली केंद्रीय मदत खालीलप्रमाणे आहेः

आर्थिक वर्ष 2013-14:  17,407.39 कोटी रुपये

आर्थिक वर्ष 2014-15:  18,288.50 कोटी रुपये

आर्थिक वर्ष 2015-16:  18,065.50 कोटी रुपये

आर्थिक वर्ष 2016-17:  18,424.43 कोटी रुपये

आर्थिक वर्ष 2017-18:  25,465.28 कोटी रुपये

आर्थिक वर्ष 2018-19:  24,998.81 कोटी रुपये

आर्थिक वर्ष 2019-20:  28,939.64 कोटी रुपये

आर्थिक वर्ष 2020-21:  29,455.72 कोटी रुपये

राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) बळकट करण्यासाठी सरकारने आणखी निधीची तरतूद सुरूच ठेवली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाला 2020-21 मधील 27,989 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद 2021-22 मध्ये वाढवून 31,100 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

याव्यतिरिक्त, राष्ट्रीय आरोग्य धोरण, 2017 मध्ये, राज्यांनी त्यांच्या आरोग्यावरील खर्च कमीत कमी 8% पर्यंत वाढवण्याची कल्पना केली आहे आणि या खर्चाच्या दोन तृतीयांश हा प्राथमिक आरोग्य सेवेसाठी असेल. याव्यतिरिक्त, एनएचएम अंतर्गत सामंजस्य करारानुसार, राज्यांना त्यांचा राज्य आरोग्य अर्थसंकल्प वार्षिक किमान 10% वाढवणे आवश्यक आहे.

राज्य सरकारे सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी) आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी) स्थापित करतात. एनएचएम अंतर्गत राज्य / केंद्रशासित प्रदेशांना सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी) आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी) स्थापित करण्यासह आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य प्रदान केले जाते. ग्रामीण आरोग्य सांख्यिकी (आरएचएस) 2019-20 नुसार, 31 मार्च, 2020 रोजी उत्तर प्रदेशसह राज्य / केंद्रशासित प्रदेशनिहाय पीएचसी आणि सीएचसींची संख्या, परिशिष्टात दिली आहे.

 

परिशिष्ट

31 मार्च 2020 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी) आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी) यांची संख्या

S. No.

State/UT

Primary Health Centres
(Rural + Urban)

Community Health Centres
(Rural + Urban)

 

 

 

 

1

Andhra Pradesh

1385

198

 

 

2

Arunachal Pradesh

124

60

 

 

3

Assam

1002

192

 

 

4

Bihar

2027

64

 

 

5

Chhattisgarh

837

174

 

 

6

Goa

59

6

 

 

7

Gujarat

1795

362

 

 

8

Haryana

485

131

 

 

9

Himachal Pradesh

588

92

 

 

10

Jharkhand

351

177

 

 

11

Karnataka

2534

208

 

 

12

Kerala

932

227

 

 

13

Madhya Pradesh

1476

330

 

 

14

Maharashtra

2675

418

 

 

15

Manipur

93

17

 

 

16

Meghalaya

143

28

 

 

17

Mizoram

65

9

 

 

18

Nagaland

137

21

 

 

19

Odisha

1377

384

 

 

20

Punjab

527

155

 

 

21

Rajasthan

2477

614

 

 

22

Sikkim

25

2

 

 

23

Tamil Nadu

1884

400

 

 

24

Telangana

885

95

 

 

25

Tripura

112

22

 

 

26

Uttarakhand

295

68

 

 

27

Uttar Pradesh

3473

723

 

 

28

West Bengal

1369

348

 

 

29

A&N Islands

27

4

 

 

30

Chandigarh

48

2

 

 

31

Dadra& Nagar Haveli and Daman &Diu

13

4

 

 

32

Delhi

546

23

 

 

33

Jammu &Kashmir

972

77

 

 

34

Ladakh

32

7

 

 

35

Lakshadweep

4

3

 

 

36

Puducherry

39

4

 

 

All India Total

30813

5649

टीपः

1. आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर  2014 मध्ये तेलंगणाची निर्मिती झाली.

2. जम्मू-काश्मीर आणि लडाखचे विभाजन होऊन ऑगस्ट 2019 दरम्यान केंद्रशासित प्रदेश झाले.

3. दादरा आणि नगर हवेली आणि दमण दीव हे जानेवारी 2020 मध्ये एक केंद्रशासित प्रदेश म्हणून विलीन झाले.

4. स्रोत: ग्रामीण आरोग्य सांख्यिकी, 2019-20

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

M.Chopade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1737230) Visitor Counter : 124


Read this release in: English , Tamil