आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण अद्ययावत स्थिती


42.15 कोटींपेक्षा अधिक लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना वितरीत

सध्या राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रूग्णालयांकडे एकूण अंतर्गत साठ्यातील आणि न वापरलेल्या अशा 2.11 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा देण्यासाठी शिल्लक

Posted On: 20 JUL 2021 9:54AM by PIB Mumbai

देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. कोविड सार्वत्रिक लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 21 जून 2021 रोजी सुरु झाला आहे. लसींची अधिक उपलब्धता, उपलब्ध होणाऱ्या लसींच्या साठ्याविषयी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आगावू सूचना देऊन, त्याद्वारे लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करण्याचा प्रयत्न, यातून लसीकरण मोहीमेला गती देण्यात आली आहे.


राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून, केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत कोविड लसी पुरवत आहे. नव्या टप्प्यात देशातील 75 टक्के लसी केंद्र सरकार खरेदी करत असून त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवल्या जात आहेत.

 

 

VACCINE DOSES

 

(As on 20 July 2021)

 

SUPPLIED

 

42,15,43,730

 

IN PIPELINE

 

71,40,000

 

CONSUMPTION

 

40,03,50,489

 

BALANCE AVAILABLE

 

 

2,11,93,241

आतापर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 42.15 कोटींपेक्षा अधिक (42,15,43,730)  लसींच्या मात्रा पुरविण्यात आल्या आहेत,आणि पुढील काही दिवसांत आणखी 71,40,000 मात्रा पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.


यापैकी, वाया गेलेल्या लसींच्या मात्रांसह एकूण 40,03,50,489 मात्रांचा वापर करण्यात आला आहे.(आज सकाळी आठ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार)


राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसह खाजगी रुग्णालयांकडे अद्याप 2.11 कोटींपेक्षा जास्त (2,11,93,241) लसींच्या मात्रा शिल्लक आहेत.


***

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1737119) Visitor Counter : 185