वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

सरकारने केली लॉजीस्टीक्स सर्वोत्कृष्टता पारितोषिकाची घोषणा


मालवाहतूक पुरवठा साखळीत समाविष्ट असणाऱ्या विविध भागीदारांना या पारितोषिकामुळे यथास्थित ओळख मिळेल

या पारितोषिकाच्या माध्यमातून कोविड-19 महामारीमुळे आलेल्या कमतरतांवर मात करण्यासाठी उद्योगांनी योजलेल्या अतिरिक्त उपाययोजनांना मान्यता मिळेल

Posted On: 19 JUL 2021 9:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जुलै 2021

मालवाहतूक क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या दृष्टीने सरकारने राष्ट्रीय मालवाहतूक सर्वोत्कृष्टता पारितोषिकाची योजना जाहीर केली.

मालवाहतूक क्षेत्रातील संघटना आणि फोरम तसेच उद्योग क्षेत्रातील वापरकर्ते व भागीदार यांच्याशी चर्चा करून या पारितोषिकांच्या कल्पनेला मूर्त रूप देण्यात आले आहे.

दोन श्रेणीत ही पारितोषिके असतील. पहिल्या श्रेणीत  पायाभूत सुविधा क्षेत्रातील मालवाहतूकदार/ सेवादात्यांचा तर दुसऱ्या श्रेणीत विविध मालवाहतूक वापरकर्त्यांचा समावेश आहे. वापरकर्त्या उद्योगांकडून पुरवठा साखळीतील विविध सहभागींची यथायोग्य ओळख होण्याच्या उद्देशाने  या पारितोषिकासाठी विस्तृत मोजपट्टी  लावण्यात आली आहे.

या पारितोषिकांनी मुळे मालवाहतूक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यपद्धती सह पद्धतीमधील सर्वसमावेशकता, प्रक्रिया मानकरीकरण, तांत्रिक अद्ययावतीकरण, डिजिटल रूपांतरण आणि शाश्वत प्रक्रिया यामधील उत्कृष्टता अधोरेखित होईल.

"या पारितोषिकाच्या माध्यमातून मालवाहतूक सेवा पुरवठादारांपैकी ज्यांनी कामात उत्कृष्टता प्राप्त केली आहे डिजिटायझेशन आणि तांत्रिकता रुळवली आहे तसेच ग्राहकोपयोगी सेवा पुरवठा आणि शाश्वत प्रक्रियांचा अवलंब अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकणे हा या पारितोषिकांमागील उद्देश आहे", असे मालवाहतूक विभागाचे विशेष सचिव पवन अगरवाल यांनी स्पष्ट केले.

"वापरकर्त्या उद्योगांना या पारितोषिकामुळे पुरवठा साखळीचे रूपांतरणपुरवठा पर्यावरणाचा विकास, कौशल्य विकास, ऑटोमेशन आणि अशा अनेक बाबींची ओळख होईल.", असेही त्यांनी नमूद केले.

covid-19 महामारीच्या काळात शेवटच्या टप्प्यातील डिलिवरि करणारे, स्टार्ट कोल्ड- स्टोरेज सुविधा, ऑक्सिजनची योग्य पद्धतीने वाहतूक आणि गरजूंपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा आणि सेवांचा विनाव्यत्यय पुरवठा यासारख्या महामारी मुळे आलेल्या कमतरतांवर मात करण्यासाठी केले गेलेले अतिरिक्त प्रयत्न या पारितोषिकांमुळे उजेडात येतील.

मालवाहतुकीच्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट प्रक्रिया लॉजिस्टिक्स एक्सलन्स गॅलरी या नामाभिधानाखाली  https://excellenceawardslogistics.gov.in येथे, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केल्या जातील. या प्रकारे मालवाहतूक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यपद्धती  एकत्रित नोंदवल्या जातील हा या पारितोषिकाचा  मुख्य उपयोग असेल.

पारितोषिक विजेत्यांची घोषणा 31 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात येईल. राष्ट्रीय ज्युरी फेरीत पोचलेल्या सर्व अंतिम विजेत्यांच्या केस स्टडीज मालवाहतूक सर्वोत्कृष्टता गॅलरीत प्रदर्शित केल्या जातील.

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1736963) Visitor Counter : 263


Read this release in: Hindi , English , Urdu , Punjabi