वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

आगामी काळात नवीकरणीय उर्जेच्या क्षेत्रात भारत नेतृत्व करेल असा पीयूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास

Posted On: 16 JUL 2021 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जुलै 2021

वाणिज्य व उद्योग मंत्री, ग्राहक व्यवहार आणि  अन्न व सार्वजनिक वितरण आणि  वस्त्रोद्योग मंत्री पीयूष  गोयल यांनी आज आत्मनिर्भर भारत-नवीकरणीय उर्जा निर्मितीसाठी स्वयंपूर्णता च्या दुसर्‍या आवृत्तीच्या समारोप सत्राला संबोधित केले.

ते म्हणाले की, आगामी काळात नवीकरणीय  उर्जेच्या क्षेत्रात भारत नेतृत्व  करेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे . या क्षेत्रात देशात होणाऱ्या प्रगतीची माहिती देताना ते म्हणाले की, सुरुवातीच्या काळात जलविद्युत ऊर्जेपासून आपण भविष्याकडे पहात होतो  आणि आता हायड्रोजन तंत्रज्ञानामध्ये काम करायला सुरवात केली आहे. हरित उर्जा स्त्रोतांपासून  हायड्रोजन निर्माण करण्यासाठी 2021-22 मध्ये हायड्रोजन ऊर्जा मोहीम  सुरू करण्यात आली आहे. ते म्हणाले की एलईडी मिशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आणखी एक यशोगाथा आहे.

गोयल म्हणाले की, आम्ही इलेक्ट्रिक कारच्या  वापरकर्त्यांना दिवसा नवीकरणीय उर्जा किंवा सौरऊर्जेचा वापर करून त्यांच्या बैटरी रिचार्ज करण्यास प्रोत्साहित करू, आणि यासाठी  आम्ही देशातील गॅस स्टेशनवर चार्जिंग स्टेशन्स सुरु करणार आहोत.

ते म्हणाले की 2023-24 पर्यंत भारत आपल्या पेट्रोल उत्पादनांमध्ये 20% इथेनॉल मिसळणार आहे. ते म्हणाले की आमचे अंतिम लक्ष्य 100% इथेनॉलवर चालणारी वाहने हे आहे. 2022 पर्यंत 175 गिगावॅट नवीकरणीय उर्जा लक्ष्याकडून आता भारत 2030 पर्यंत 450 गिगावॅट उद्दिष्टाकडे वाटचाल करत आहे.

गोयल म्हणाले की ऐतिहासिकदृष्ट्या भारतीयांनी निसर्गाचा नेहमीच आदर केला आहे. आपल्यासाठी पर्यावरणाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे कारण तो  प्रत्येक भारतीयाचा अंगभूत गुण  आहे.

 

 M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1736305) Visitor Counter : 174


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu