वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
यावर्षीच्या जून महिन्यात भारतातील अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीत 52.4% ची वाढ
Posted On:
16 JUL 2021 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2021
भारतातून जून 2021 मध्ये 32.50 बिलीयन अमेरिकी डॉलर्स किमतीच्या व्यापारी मालाची निर्यात झाली, त्या तुलनेत गेल्या वर्षीच्या जून महिन्यात 21.91 बिलीयन अमेरिकी डॉलर्सची निर्यात नोंदली गेली होती. यावरून, निर्यातीत 48.34% सकारात्मक वाढ झाल्याचे दिसत आहे. भारतीय अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीने आधीच्या दोन महिन्यांतील कल कायम ठेवत जून 2021 मध्ये देखील चढता क्रम दर्शविला होता. गेल्या वर्षीच्या जून महिन्यातील निर्यातीच्या आकडेवारीशी तुलना करता भारतातील अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीने यावर्षी जून महिन्यात 52.4% ची वाढ नोंदविली.
जून 2019 मध्ये देशातील अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात 6,274.9 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतकी होती, जून 2020 मध्ये 5,841.6 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किमतीच्या वस्तूंची निर्यात झाली तर जून 2021 मध्ये यात वाढ होऊन ती 8,903.5 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली. सन 2021-22 या वर्षात एप्रिल ते जून या कालावधीत झालेली एकूण अभियांत्रिकी निर्यात 24,772.6 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स होती हे लक्षात घेता सन 2020-21 या वर्षात एप्रिल ते जून या कालावधीत करण्यात आलेल्या निर्यातीपेक्षा 82 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसत आहे.
वाहन उद्योग (विविध मोटार वाहने/ कार्स, दोन चाकी आणि तीन चाकी वाहने तसेच वाहनांचे घटक आणि सुटे भाग यांचा समावेश असलेल्या) क्षेत्राने विद्यमान वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वर्ष 2019-2020 मधील याच कालावधीच्या तुलनेत 1.7% ची वाढ नोंदवली. वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीतील निर्यातीचा संदर्भ लक्षात घेता या वर्षी वाहन उद्योग क्षेत्राच्या निर्यातीत 195% ची वाढ नोंदली गेली. प्रामुख्याने दोन चाकी आणि तीन चाकी वाहने (279%ची); मोटार वाहने आणि कार्स (159% ची) तसेच वाहनांचे घटक आणि सुटे भाग(204% ची) यांच्या निर्यातीतील तीव्र वाढीमुळे वाहन उद्योग क्षेत्राच्या निर्यातीत ही वाढ झाल्याचे दिसते आहे.
Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736192)
अभ्यागत कक्ष : 240