शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्री आणि केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री उद्या संयुक्तपणे शालेय नवनिर्माण प्रसिद्धीदूत प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करणार
Posted On:
15 JUL 2021 8:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2021
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा हे 50,000 शालेय शिक्षकांसाठी 16 जुलै 2021 रोजी संयुक्तपणे “ शालेय नवनिर्माण प्रसिद्धीदूत प्रशिक्षण कार्यक्रम” (स्कूल इनोव्हेशन अम्बेसेडर ट्रेनिंग प्रोग्रॅम) सुरू करणार आहेत.
नाविन्यपूर्ण आणि एक प्रकारचा हा प्रशिक्षण कार्यक्रम शालेय शिक्षकांसाठी आहे, ज्याद्वारे 50,000 शालेय शिक्षकांना नाविन्य, उद्योजकता, आयपीआर, रचनात्मक विचार, उत्पादक विकास, कल्पना निर्मिती इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या संशोधन विभागातर्फे आणि एआयसीटीई यांच्या वतीने शालेय शिक्षकांसाठी हा कार्यक्रम “नवनिर्माण प्रसिद्धीदूत प्रशिक्षण कार्यक्रम उच्च शिक्षण संस्थांच्या शिक्षक प्रतिनिधींसाठी” च्या धर्तीवर आखण्यात आला आहे. हे प्रशिक्षण केवळ ऑनलाइन पद्धतीने दिले जाईल.
कार्यक्रम पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://youtube.be/RUIf3TE7OfU
M.Chopade/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1735994)
Visitor Counter : 229