आयुष मंत्रालय

ईशान्य जन औषधी संस्थेचे  (एनईआयएफएम) ईशान्य आयुर्वेद आणि जनौषधी संशोधन संस्था (एनईआईएएफएमआर)असे नामकरण करायला आणि कार्यक्षेत्र बदलण्यास  केंद्रीय मंत्रिमंडळाची  मंजुरी

प्रविष्टि तिथि: 14 JUL 2021 4:18PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ईशान्य आयुर्वेद आणि जनौषधी संशोधन संस्था (एनईआईएएफएमआर)असे नामकरण करायला आणि कार्यक्षेत्र  बदलण्यास मंजुरी दिली आहे.

 

तपशीलः

काळाची गरज लक्षात घेऊन अरुणाचल प्रदेशच्या  पासिघाट येथे आयुर्वेद व जनौषधीत  दर्जेदार शिक्षण व संशोधन प्रदान करण्यासाठी ईशान्य जन औषधी संस्थेचे  (एनईआयएफएम)  ईशान्य आयुर्वेद आणि जनौषधी संशोधन संस्था (एनईआईएएफएमआर) असे नामकरण आणि कार्यक्षेत्र बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तसेच .महत्वपूर्ण बदल  मेमोरेंडम ऑफ एसोसिएशन आणि नियमांमध्ये केले  जातील.

 

प्रभावः

आयुर्वेद आणि जनौषधींमध्ये दर्जेदार शिक्षण आणि संशोधन देण्यासाठी संस्थेच्या  आदेशात आयुर्वेदचा समावेश ईशान्य प्रदेशातील लोकांना अत्यंत फायदेशीर ठरेल. ही संस्था केवळ भारतातच नव्हे तर तिबेट, भूतान, मंगोलिया, नेपाळ, चीन आणि इतर मध्य आशियाई देशांसारख्या शेजारच्या देशांमध्येही आयुर्वेद आणि जनौषधींच्या  विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध करुन देईल.

 

पार्श्वभूमी:

एनईआयएफएम, पासीघाटची स्थापना पारंपरिक जनौषधी  आणि आरोग्यविषयक पद्धतींचे पद्धतशीर संशोधन, दस्तऐवजीकरण आणि प्रमाणीकरणासाठी केली गेली.  ज्या उद्दीष्टांसाठी संस्था स्थापन केली गेली त्यामध्ये जनौषधींच्या सर्व बाबींसाठी उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून काम करणे, पारंपारिक उपचारपद्धती आणि वैज्ञानिक संशोधन, सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण आणि जन औषध पद्धतींचे प्रमाणिकरण, संभाव्य वापरासाठी उपाय आणि उपचार यांच्यात संवाद तयार करणे सार्वजनिक आरोग्य सेवा आणि भविष्यातील संशोधन इ.समाविष्ट आहे.

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1735658) आगंतुक पटल : 136
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Malayalam