उपराष्ट्रपती कार्यालय
उर्दू ही जगभरात बोलल्या जाणाऱ्या सर्वात सुंदर भाषांपैकी एक आहे: उपराष्ट्रपती
हैदराबाद आणि डेक्कन ही उर्दूची प्राचीन केंद्रे आहेतः उपराष्ट्रपती
श्री नायडू यांनी राज्य सरकारांना प्रादेशिक भाषांमध्ये अधिक प्रकाशने प्रकाशित करण्याचे आवाहन केले
आपले ग्रामीण लोकसाहित्य आणि स्थानिक कथा लोकप्रिय करण्याची आवश्यकता आहेः उपराष्ट्रपती
उपराष्ट्रपतींना उर्दू आणि तेलगू भाषेतील विविध पुस्तके भेट देण्यात आली.
Posted On:
13 JUL 2021 7:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जुलै 2021
उपराष्ट्रपती श्री. वेंकैया नायडू यांनी आज उर्दू भाषेच्या समृद्धीचा उल्लेख केला आणि ते म्हणाले, "उर्दू ही जगभरात बोलल्या जाणाऱ्या सर्वात सुंदर भाषांमधील एक आहे." मातृभाषेचे महत्त्व लक्षात घेत त्यांनी लोकांना त्यांच्या मातृभाषेतूनच नेहमी बोलण्याचे आवाहन केले. विशेषतः हैदराबाद आणि संपूर्ण डेक्कन ही उर्दूची प्राचीन केंद्रे असल्याचे त्यांनी नमूद केले.
नायडू यांना ज्येष्ठ पत्रकार श्री.जे.एस. इफ्तेखार लिखित 'उर्दू कवी व लेखक - जेम्स ऑफ डेक्कन' हे पुस्तक देण्यात आले. त्यांना तेलंगण राज्य भाषा व संस्कृती विभाग संचालक श्री ममीदी हरिकृष्ण यांच्याकडून माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या जीवनावरील पुस्तके तसेच ‘सत्यकासी भार्गव लिखित‘ मानवोत्तम रामा ’आणि श्री मल्लिकार्जुन लिखित‘ नालागोंडा कथलु’ ही पुस्तके देण्यात आली.
‘जेम्स ऑफ़ डेक्कन’ हा गद्य आणि पद्य संग्रह आहे ज्यात डेक्कन प्रांतातील 51 उल्लेखनीय कवी आणि लेखकांचे जीवन आणि कार्य विशद केले आहे. या पुस्तकात हैदराबादचा संस्थापक मुहम्मद कुली कुतुब शहा यांच्या काळापासून सध्याच्या काळापर्यंत डेक्कनच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा यांची ओळख करून देण्यात आली आहे.
माजी पंतप्रधान दिवंगत श्री पी.व्ही. नरसिंह राव यांच्या जीवनावर पुस्तक आणण्यासाठी तेलंगणा सरकारचे कौतुक, करत उपराष्ट्रपतींनी सर्व राज्य सरकारांना असे आवाहन केले की तरुण पिढीला स्थानिक नायक कळावेत यासाठी स्थानिक व प्रादेशिक भाषांमध्ये अशी प्रकाशने आणावीत.
भगवान श्री रामांचे गुण एक आदर्श पुरूषोत्तम म्हणून दर्शविण्याच्या प्रयत्नांबद्दल नायडू यांनी ‘मानवोत्तम रामा’ च्या लेखकाची प्रशंसा केली. भगवान राम यांची मूल्य आणि गुण कालातीत राहतील असे ते म्हणाले.
‘नल्लागोंडा कथालू’ हे पुस्तक मिळाल्यावर उपराष्ट्रपतींनी भावी पिढ्यांसाठी त्यांचे जतन करण्यासाठी आपल्या ग्रामीण लोककथा आणि स्थानिक कथा लिहिण्याच्या आणि लोकप्रिय करण्याच्या गरजेवर भर दिला. आपल्या दैनंदिन जीवनात अंतर्भूत असलेले बाल साहित्य प्रकाशित करण्यासाठी अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्याचे त्यांनी आवाहन केले.
उपराष्ट्रपतींनी पुस्तके प्रकाशित करण्याकरिता केलेल्या प्रयत्नांसाठी लेखकांचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
* * *
M.Chopade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1735194)
Visitor Counter : 265