आदिवासी विकास मंत्रालय

ट्राइब्ज इंडिया: आगामी रक्षाबंधन उत्सवासाठी आणि इतर गरजेच्या भेटवस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होणारे ठिकाण

Posted On: 13 JUL 2021 11:43AM by PIB Mumbai

ट्राइब्ज इंडिया (प्रत्यक्ष दालने आणि ऑनलाइन ई-कॉमर्स मंच अशा दोन्हीचे नेटवर्क) हे  तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला द्यायच्या भेटवस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे आदर्श ठिकाण आहे . ट्राइब्ज इंडिया इथे  आदिवासी उत्पादनांच्या आकर्षक आणि विस्तृत श्रेणीत उत्कृष्ट हस्तकलेच्या तसेच धातूच्या वस्तू, वस्त्रे आणि सेंद्रिय हर्बल उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

यंदा ट्राइब्ज इंडिया कॅटलॉगमध्ये  खास राखी विभाग तयार केला असून त्यात देशभरातील विविध आदिवासींनी हाताने बनविलेल्या राख्या, पूजेसाठी वापरले जाणारे धातूचे डबे आणि तोरण आदी सजावटीच्या वस्तू मिळू शकतात. या व्यतिरिक्त, ट्राइब्ज इंडिया मध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी रंगीबेरंगी कुर्ते, सलवार, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्र शैलीतील जॅकेट्स, तसेच माहेश्वरी, चंदेरी, बाग, कंठा, भंडारा, तुसार, संभालपुरी आणि इकत इत्यादी प्रकारातील साड्या, कपडे ट्राइब्ज इंडिया दालनांमध्ये मध्ये तसेच संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

आदिवासींच्या विविध वस्तू आणि उत्पादनांच्या विकास आणि विपणना द्वारे आदिवासींचे जीवनमान उंचावून त्यांचे सबलीकरण करण्याच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने ट्रायफेड ट्राइब्ज इंडिया आपल्या देशभरातील दालनांमधील विक्रीसाठी ठेवलेल्या विविधांगी व आकर्षक श्रेणीतील उत्पादनांची व्याप्ती वाढवत आहे.

 

देशातील 137 ट्राइब्ज इंडिया दालने  आणि ई-कॉमर्स मंच (www.tribesindia.com) इथे ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करणारी उत्पादने उपलब्ध करून देतात.

 

कठपुतळी  सारख्या मुलांच्या खेळण्यांपासून ते पारंपरिक विणकामापर्यंत जसे की डोंग्रिया शाल आणि बोडो विणकाम असलेली उच्च प्रतीची आणि विविधांगी वस्त्रप्रावरणे आणि रेशमी वस्त्रे; धातू शिल्प ते बांबू उत्पादने; अशी कोणतीही आणि प्रत्येक प्रकारची भेटवस्तू इथे उपलब्ध आहे. सर्व भेटवस्तूसाठी  सेंद्रिय, पुनर्चक्रीकरणीय, शाश्वत वेष्टन साहित्य वापरले जाते , ज्याची रचना सुप्रसिद्ध डिझायनर  सुश्री रीना ढाका यांनी खास ट्राइब्ज इंडियासाठी केली आहे.

 

स्नेह आणि आधाराचे प्रतीक असणाऱ्या या रक्षाबंधन उत्सवाची तयारी करताना आपण भेटवस्तू निवडण्यासाठी आपल्या जवळच्या ट्राइब्ज इंडिया दुकानाला किंवा संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

***

Jaydevi PS/VJ/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1735025) Visitor Counter : 225