गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या नवनिर्मित नारकोटिक्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टंट्सच्या संशोधन आणि विश्लेषण सर्वोत्कृष्टता केंद्राचे केले उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
12 JUL 2021 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जुलै 2021
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अहमदाबाद येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या नारकोटिक्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टंट्स संशोधन आणि विश्लेषण सर्वोत्कृष्टता केंद्राचे आज उद्घाटन केले. शाह यांनी महिलांविरूद्धच्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या व्हर्च्युअल प्रशिक्षणाचे देखील उद्घाटन केले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, देशातील फौजदारी न्याय व्यवस्था अधिक सशक्त आणि निकालाभिमुख करण्यासाठी या विद्यापीठाला देशातील सर्वोत्तम विद्यापीठ बनवणे अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणाले की, थर्ड डिग्री वापरण्याचे युग संपले आहे आणि आता वैज्ञानिक तपासणीच्या आधारे सर्वात कठोर गुन्हेगारांना दोषी साबित केले जाऊ शकते.

अमित शहा म्हणाले की, देशातील 7 राज्यांनी नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी, गुजरातशी संलग्न महाविद्यालये आणि उत्कृष्टता केंद्रे उघडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शाह म्हणाले की, हे विद्यापीठ देशभरात त्याच्या शाखा स्थापन करेल आणि तरुणांना न्यायवैद्यक क्षेत्रात पुढे येण्याची संधी देईल असा त्यांना विश्वास आहे. या केंद्रामध्ये स्थापन केलेले सायबर डिफेन्स सेंटर आणि बॅलिस्टिक रिसर्च सेंटर हे संपूर्ण आशियामध्ये अनोखे केंद्र आहे आणि देश या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, भारत एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था असल्यामुळे सायबर युद्ध आणि सायबर गुन्ह्यांविरोधातील लढाई आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.


M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1734941)
आगंतुक पटल : 270