विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

खोल समुद्रातील मोहीम आणि महासागरातील संसाधनांच्या माध्यमातून 100 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक "नील अर्थव्यवस्थेचे" भारताचे उद्दिष्ट - मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 12 JUL 2021 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2021

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) भू विज्ञान राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणु उर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री  डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, येत्या काही वर्षांत भारताने खोल समुद्रातील मोहीम आणि महासागरातील  संसाधनांच्या माध्यमातून 100 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक  "नील अर्थव्यवस्थेचे " उद्दिष्ट  ठेवले आहे.

आज नवी दिल्लीत भू विज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिकांना संबोधित करताना त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीला आणखी  गती देण्यासाठी सागरी अन्वेषणाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले.  ते म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेला अंदाजे 110 अब्ज रुपयांपर्यंत मदत करण्याच्या दृष्टीने ही एक नवीन संधी  असू शकते. भू  विज्ञान मंत्रालयाने आखलेल्या "डीप ओशन मिशन"चे काम भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या सहकार्याने केले जाईल आणि वेगवेगळ्या मंत्रालयांतर्गत कार्यरत विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांचे  प्रयत्न एकत्रित करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असेल असे ते म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, डीप ओशन मिशन" चे सर्वसामान्यांनाही दूरगामी फायदे होतील. उदाहरणार्थ, शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यात आणि समुद्राच्या पट्ट्यातून खनिजे उत्खनन करण्यासाठी आणि  पाण्याचे पृथक्करण करण्यात ते मदत करू शकते.

 

 

 

 M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1734933) Visitor Counter : 250


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu