कंपनी व्यवहार मंत्रालय
हितधारकांबरोबर संपर्क वाढवण्याच्या सल्लामसलत पत्रावर सूचना सादर करण्याच्या अंतिम तारखेला 30 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ
Posted On:
09 JUL 2021 6:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2021
राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाने (एनएफआरए) त्याच्या “हितधारकांबरोबर संपर्क वाढवणे : तांत्रिक सल्लागार समितीचा अहवाल ” या शीर्षकांतर्गत सल्लामसलत पत्रावर सूचना सादर करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2021 पर्यंत वाढविली आहे.
सल्लामसलत पत्र https://nfra.gov.in/consultation_papers वर पाहिले जाऊ शकते.
आपली मते comments-tac.paper@nfra.gov.in या ईमेलद्वारे सादर करता येतील किंवा एनएफआरए कार्यालयात टपालाद्वारे खालील पत्त्यावर पाठवता येतील.
सचिव
राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण
7 वा मजला, एचटी हाऊस
18-20, कस्तुरबा गांधी मार्ग
नवी दिल्ली- 110001
एनएफआरए विषयी
कंपनी कायदा, 2013 च्या कलम 132 च्या पोटकलम (1) अंतर्गत भारत सरकारने 01 ऑक्टोबर, 2018 रोजी राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण (एनएफआरए) ची स्थापना केली. एनएफआरएचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे एनएफआरए नियम, 2018 अंतर्गत उच्च दर्जाचे लेखांकन आणि लेखापरीक्षण मानक स्थापित करून कंपन्या व कॉर्पोरेट संस्थांनी आणि लेखापरीक्षकाने सादर केलेल्या कामाची प्रभावी देखरेख करून शासित कंपन्या किंवा कॉर्पोरेटशी संबंधित गुंतवणूकदार, धनको आणि इतरांच्या हिताचे व हितसंबंधांचे रक्षण करणे.
सल्लामसलत पत्राविषयी
विविध हितधारकांच्या दृष्टिकोनातून उपलब्ध माहिती एनएफआरए ला देण्यासाठी एनएफआरएने तांत्रिक सल्लागार समितीची (टीएसई) स्थापना केली आहे. एनएफआरएच्या हितधारकांशी असलेल्या संबंधांबद्दल जाणून घेण्यासाठी टीएसईने सल्लामसलत उपक्रम सुरु केला आहे.
M.Chopade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1734282)
Visitor Counter : 249