अर्थ मंत्रालय
पंकज चौधरी यांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला
Posted On:
09 JUL 2021 3:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2021
पंकज चौधरी यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला .
चौधरी हे 17 व्या लोकसभेत उत्तर प्रदेशातील महाराजगंजचे खासदार आहेत. खासदार म्हणून सध्या त्यांचा सहावा कार्यकाळ सुरु आहे. तीन दशकांहून अधिक काळ लोकसेवेत सक्रिय असलेले चौधरी यांनी यापूर्वी गोरखपूरचे उपमहापौरपदही भूषवले आहे.
चौधरी हे गोरखपूर विद्यापीठाचे पदवीधर असून त्यांचे वय 56 वर्षे आहे.
काल डॉ भागवत किशनराव कराड हे देखील अर्थ मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून रुजू झाले होते.
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1734232)
Visitor Counter : 200