जलशक्ती मंत्रालय
प्रल्हाद सिंह पटेल यांनी जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला
बिश्वेश्वर तुडू यांनी जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला
Posted On:
08 JUL 2021 7:56PM by PIB Mumbai
जलशक्ती मंत्रालयाचे नवे राज्यमंत्री म्हणून प्रल्हाद सिंह पटेल यांनी आणि बिश्वेश्वर तुडू यांनी कार्यभार स्वीकारला. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या दोन्ही नवनियुक्त मंत्र्यांचे स्वागत केले.
पटेल यांच्यासोबत एकत्र काम करतांना जलशक्ती मंत्रालयाला नवी ताकद मिळेल, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाल्शक्ती अभियान पूर्ण करण्यास मदत होईल, असा विश्वास शेखावत यांनी व्यक्त केला.
मूळचे मध्यप्रदेशचे असलेले, प्रल्हाद सिंह पटेल उच्चशिक्षित असून पाचवेळा लोकसभा खासदार राहिलेले आहेत. याआधी त्यांनी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. यावेळी दोन्ही नवनियुक्त मंत्र्यांनी जलक्षेत्राशी निगडीत सार्वजनिक हिताच्या मुद्यांवर आपले विचार मांडले.
बिशेश्वर तुडू ओडिशातील मयूरभंज येथील लोकसभेचे खासदार आहेत. अनुसूचित जाती, जमातीकल्याण समितीचे सदस्य, खते आणि रसायने सल्लागार समितीचे स्थायी सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
***
M.Chopade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733870)
Visitor Counter : 180