आयुष मंत्रालय
आयुष मंत्री श्री किरेन रिजिजू यांनी आयुष क्षेत्रातील पाच महत्त्वाच्या पोर्टल्सचे केले उदघाटन
“सर्व आयुष हितसंबंधीतांना या उपक्रमांचा लाभ होणार”
Posted On:
05 JUL 2021 8:40PM by PIB Mumbai
सोमवार हा आयुष क्षेत्रासाठी ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण दिवस ठरला, कारण केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री किरण रिजिजू यांनी एका ऑनलाईन कार्यक्रमात पाच महत्त्वाच्या पोर्टल्सचे उद्घाटन आणि चार प्रकाशने प्रकाशित केली. भारतीय लोकांना आरोग्य संरक्षण देण्यासाठी, राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानात आयुष महत्वाची भूमिका बजावणार असल्याचीही, मंत्रीमहोदयांनी यावेळी आठवण करुन दिली.
केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) मंत्री किरण रिजिजू यांनी, यावेळी द्रुकश्राव्य माध्यमाद्वारे झालेल्या कार्यक्रमात असेही जाहीर केले,की अमर (AMAR), आरएमआयएस, साहि(SAHI) आणि ई-मेधा पोर्टल्स ही आयुर्वेद डेटासेटद्वारे सीटीआरआय पोर्टलला समर्पित करण्यात येत आहेत. त्यांनी पारंपारीक भारतीय औषध प्रणालीशी संबंधित चार प्रकाशनेही यावेळी प्रसिद्ध केली आणि या उपक्रमांकरीता आयसीएमआर आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्था यांनी सहकार्याने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
पोर्टल्सचे संक्षिप्त महत्त्व
1. क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियाचा आयुर्वेद डेटासेट- सीटीआरआय हा जागतिक आरोग्य संघटनेच्या रुग्णांवरील प्रत्यक्ष चाचण्यांच्या आंतरराष्ट्रीय नोंदणीकृत मंचाअंतर्गत क्लिनिकल चाचण्यांची (रुग्णांवरील प्रत्यक्ष चाचण्या)प्राथमिक नोंद करणारा माहिती ठेवा आहे. सीटीआरआय हा आयुर्वेद डेटासेट आयुर्वेद उपचारांनुसार आयुर्वेद संज्ञा आधारित रूग्णांवरील प्रत्यक्ष अभ्यासाची नोंद करून ठेवणे, सुलभ करते. आयुर्वेद आधारित रुग्णांवरील प्रत्यक्ष चाचण्यांसाठी (क्निनिकल स्टडीज)जगभरातील दृश्यमानतेसाठी हे एक उत्तम पाऊल आहे.
2. सीसीआरएएस-संशोधन व्यवस्थापन माहिती प्रणाली- आयसीएमआर आणि सीसीआरएएस यांचा हा एक संयुक्त प्रयत्न असून, हे पोर्टल आयुर्वेद आधारीत अभ्यासाच्या संशोधन आणि विकासासाठी एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळवण्याचे साधन ठरेल. या पोर्टलच्या माध्यमातून आयुर्वेदातील अनुभवी वैज्ञानिक, उपचार तज्ञ यांचे संशोधनाकरीता विनामूल्य मार्गदर्शन घेतले जाऊ शकते. या पोर्टलमध्ये संशोधन साधने, संदर्भ सामग्री यांचा देखील समावेश आहे.
3. ई-मेधा (इलेक्ट्रॉनिक वैद्यकीय वारसा प्रवेश) पोर्टल- एनआयसीच्या ई-ग्रंथालय मंचावरुन 12,000 हून अधिक भारतीय वैद्यकीय वारसा पुस्तकांसाठी ऑनलाईन पध्दतीने ग्रंथालय उपलब्ध होईल.
4. अमर (आयुष हस्तलिखित प्रगत भांडार, Ayush Manuscripts Advanced Repository) पोर्टल- हे पोर्टल अत्यंत मौलिक आहे .भारतातून किंवा जगाच्या इतर कोणत्याही भागातून
आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, सोवा रिग्पा या उपचार पध्दतीतील ग्रंथालयांमधील,संपूर्ण संग्रहातील किंवा स्वतंत्र संग्रहातील हस्तलिखिते अथवा अनुक्रमणिका (कॅटलॉग) शोधण्यासाठी कठीण (दुर्लभ)आणि दुर्मिळ माहितीचे डिजिटायझेशन या पोर्टलवर केले आहे.
5. शाई (आयुर्वेद ऐतिहासिक छापांचे प्रदर्शन Showcase of Ayurveda Historical Imprints) पोर्टल - या पोर्टलमधील माहीती शिलालेख पुरातन-वनस्पतिविषयक माहिती, शिल्पकला, मानववंशशास्त्राचे स्त्रोत आणि प्रगत पुरातत्व आनुवंशिक अभ्यास याबाबत सविस्तर माहिती दर्शवितात. या पोर्टल्सचा उपयोग स्वदेशी आरोग्य सेवांच्या पद्धतींवर आधारीत भारतीय ज्ञान प्रणाली समजून घेण्यासाठी लक्ष्यवेधक रीतीने होऊ शकेल.
***
M.Chopade/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1732936)
Visitor Counter : 357