सांस्कृतिक मंत्रालय
श्री प्रह्लादसिंग पटेल यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे ब्रिक्स देशांच्या संस्कृती मंत्र्यांची सहावी बैठक संपन्न
Posted On:
02 JUL 2021 10:50PM by PIB Mumbai
संस्कृती आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र व प्रभार), श्री प्रह्लादसिंग पटेल यांनी शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे ब्रिक्स देशांच्या संस्कृती मंत्र्यांची 6 वी बैठक आयोजित केली होती. संघराज्य प्रजासत्ताक ब्राझील, रशियन संघराज्य, भारत प्रजासत्ताक, चीन जन प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक यांच्या संस्कृती मंत्रालयांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत भाग घेतला.
संबंध आणि सुसंवाद सांस्कृतिक समन्वय या संकल्पनेअंतर्गत ब्रिक्स देशांमधील सांस्कृतिक उपक्रमांच्या प्रगतीसाठी आणि विस्तारासाठी चर्चा झाली.
संस्कृती राज्यमंत्र्यांनी बैठकीतील उपस्थितांना संबोधित केले आणि ब्रिक्समधील सांस्कृतिक सहकार्य बळकट करण्यासाठी भारताचा दृष्टीकोन सादर केला. मंत्री म्हणाले की, कोविड 19 स्थितीमुळे जगाला गेल्या दीड वर्षापासून या संकटाचा सामना करावा लागला आहे.
संस्कृती राज्यमंत्र्यांनी बैठकीतील उपस्थितांना संबोधित केले आणि ब्रिक्समधील सांस्कृतिक सहकार्य बळकट करण्यासाठी भारताचा दृष्टीकोन सादर केला.
कोविड 19 स्थितीमुळे जगाला गेल्या दीड वर्षापासून या संकटाचा सामना करावा लागला आहे सांस्कृतिक पैलूंवरील परिमाणांसह जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर महामारीचा दुष्परिणाम होण्याची चिंता मंत्र्यांनी व्यक्त केली.सद्य परिस्थितीत डिजिटल तंत्राचा वापर आणि त्याची स्वीकार्यता यावर त्यांनी भाष्य केले.
ब्रिक्स देशांतील मूर्त आणि अमूर्त वारशाच्या ज्ञानावर सांस्कृतिक अनुभवांची ऑनलाइन देवाणघेवाण करण्याच्या क्षेत्रामधील सहकार्यांवर मंत्र्यांनी भर दिला.
समतोल आंतरराष्ट्रीय मानवतावादी संवाद स्थापित करण्यासाठी संस्कृतीच्या भूमिकेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.संग्रहालये, कला, नाट्य इत्यादी क्षेत्रात ऑनलाइन सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक संस्थांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.आपल्या हस्तलिखितांमध्ये असलेल्या माहितीच्या अमूल्य खजिन्याचा उपयोग करण्याच्या उद्देशाने, मंत्र्यांनी प्राचीन हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन क्षेत्रात ब्रिक्स आघाडी स्थापनेचा प्रस्ताव दिला.
श्री पटेल यांनी विद्यमान युनेस्को अधिवेशनांच्या अनुपालनाबरोबरच ब्रिक्सच्या चौकटीत परस्पर मदत आणि पाठिंबा देऊन आपल्या मूर्त व अमूर्त सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्ताने आयोजित ‘आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम’ अंतर्गत मार्च 2021 पासून सुरु झालेल्या ऐतिहासिक सोहळ्याची त्यांनी माहितीही दिली.
श्री पटेल यांनी ब्रिक्स अध्यक्षपदासाठी असलेल्या “ब्रिक्स @ 15:: ब्रिक्स सांस्कृतिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या संदर्भात सातत्य, एकत्रीकरण आणि जाणीव यासाठी आंतर ब्रिक्स सहकार्य.या भारताच्या संकल्पनेचाही उल्लेख केला.
महामारीवर मात करण्याच्या दृष्टीने, संग्रहालये, कला दालने , नाट्यगृह, ग्रंथालये या क्षेत्रांत ब्रिक्स देशांमधील सांस्कृतिक सहकार्य बळकट करण्यावर, वाढविण्यावर आणि ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला चालना देण्यासाठी या बैठकीत घोषणापत्र जाहीर करत सहमती दर्शविली गेली.
बैठकीच्या शेवटी, ब्रिक्स संस्कृती मंत्र्यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे सहाव्या बैठकीतीळघोषणापत्रावर सदस्य देशांच्या सर्व प्रतिनिधींनी स्वाक्षरी केली.
***
Jaydevi PS/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1732419)
Visitor Counter : 220