वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारताच्या इतिहासात एका तिमाहीतील (पहिली तिमाही  2021-22, 95 अब्ज डॉलर्स) आतापर्यंतची सर्वाधिक वाणिज्य वस्तूंची  निर्यात


2021-22 मध्ये भारताने 400 अब्ज डॉलर्सच्या वाणिज्य वस्तूंच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे

Posted On: 02 JUL 2021 7:07PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री, रेल्वे आणि ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष  गोयल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत  वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या 2021-22 च्या पहिल्या तिमाहीतील (एप्रिल - जून) कामगिरीची माहिती दिली.  2021-22 साठी 400 अब्ज डॉलर्स इतके  निर्यातीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य कसे निश्चित केले  हे त्यांनी नमूद केले.

पियुष  गोयल म्हणाले की, क्षेत्रनिहाय  हस्तक्षेप, सर्व हितधारकांचा सहभाग आणि संपूर्ण सरकारच्या कामकाजामुळे ही वाढ साध्य करण्यात  मदत झाली. प्रक्रियेचे सुलभकरण, मुदतवाढ आणि परवाने या सर्वांचा परिणाम निर्यातीच्या विक्रमी कामगिरीत  झाला असे  ते म्हणाले. आघाडीवर राहून नेतृत्व केल्याबद्दल त्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले.

गोयल पुढे म्हणाले की सेवा क्षेत्राची कामगिरीही उत्कृष्ट झाली  आहे आणि महामारी असूनही रोगानंतरही सन  2019-20 मधील सेवांच्या निर्यातीच्या   सुमारे 97%  निर्यात गेल्या आर्थिक वर्षात शक्य झाली आहे.

या पत्रकार परिषदेला  वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री, सोम प्रकाश  आणि हरदीपसिंग पुरी उपस्थित होते. त्यानंतर वाणिज्य विभाग आणि डीपीआयआयटीच्या सचिवांनी त्यांच्या संबंधित विभागांच्या कामगिरीविषयी माध्यमांना माहिती दिली.

भारताच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक वाणिज्य मालाची  निर्यात

भारताच्या इतिहासात 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत 95 अब्ज डॉलर्स इतकी आतापर्यंतची सर्वात मोठी वाणिज्य मालाची निर्यात झाली आहे. 2020-21 च्या पहिल्या तिमाहीतील निर्यातीपेक्षा ही 85% जास्त आहे आणि 2019-20 च्या पहिल्या तिमाहीतील निर्यातीपेक्षा 18% जास्त आहे.

कामगारांची मोठी संख्या असलेल्या क्षेत्रात निर्यातीत वेगवान वाढ

कामगारांची मोठी संख्या असलेल्या अनेक  क्षेत्रांमध्ये निर्यातीत वेगवान वाढ झाली आहे. अभियांत्रिकी वस्तू क्षेत्रातील निर्यात 2019-20 च्या  पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 5.2 अब्ज डॉलरने वाढली आहे. त्याचप्रमाणे तांदूळ निर्यातीची वाढ मे 2020 पासून सकारात्मक राहिली असून 2019-20 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 2021-22  च्या पहिल्या तिमाहीत 37% वाढ झाली आहे.

एप्रिल 2021 मध्ये प्रमुख देशांच्या तुलनेत भारताची निर्यात कामगिरी

जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत एप्रिल 2020 मध्ये भारताने निर्यातीत उत्कृष्ट  कामगिरी करून दाखवली आहे. एप्रिल 2019 च्या तुलनेत एप्रिल 2021  मध्ये भारताच्या निर्यातीत झालेली वाढ ही युरोपियन संघ , जपान, अमेरिका , कोरिया आणि ब्रिटन  या इतर प्रगत अर्थव्यवस्थांच्या तुलनेत जास्त होती.

 

थेट परकीय गुंतवणुकीचा विक्रमी  ओघ

2020-21 मध्ये भारतामध्ये 81.72 अब्ज डॉलर्स इतकी आतापर्यंतची सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक झाली.  2019-20 मधील 74.39 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत ती 10% जास्त आहे.

 

स्टार्टअप इंडिया

डीपीआयआयटीने मान्यता दिलेल्या स्टार्टअपची संख्या 50,000च्या पुढे गेली  आहे आणि ती भारतातील 623 जिल्ह्यांमध्ये पसरली आहे.  16,000 पेक्षा अधिक स्टार्टअप्सनी  2020-21 मध्ये सुमारे 1.8 लाख औपचारिक रोजगार निर्मिती केली आहे.

 

अनुपालन भार कमी झाला

व्यवसाय  सुलभता सुधारण्यासाठी आणि अनुपालन भार कमी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात  6,426 अनुपालन कमी करण्यात आले . दुसर्‍या टप्प्यात 3,177 अनुपालन कमी केले जात आहे. पहिल्या टप्प्यासाठी मुदत 31 मार्च 2021 होती आणि दुसऱ्या टप्प्यासाठी  15 ऑगस्ट 2021 आहे.

 

गुंतवणूक मंजूरी विभाग

राष्ट्रीय  सिंगल विंडो प्रणाली हा विविध मंजुरी  मिळवण्यासाठी वन स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. एकत्रीकरणाच्या पहिल्या टप्प्यात, 43 खाती / मंत्रालये आणि 14 राज्यांची एकल विंडो सिस्टम कार्यरत आहे. प्री-लाँच आवृत्तीची व्यापक चाचणी सुरू आहे आणि ती सुरळीत सुरु करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1732339) Visitor Counter : 186


Read this release in: English , Urdu , Hindi , Gujarati