आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरणाची ताजी माहिती


राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 31.83 कोटींपेक्षा अधिक लसींच्या मात्रांचा पुरवठा

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 78 लाख मात्रा उपलब्ध

प्रविष्टि तिथि: 29 JUN 2021 10:50AM by PIB Mumbai

देशभरातल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरुवात झाली. अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची पूर्वसूचना दिली आहे जेणेकरुन ते लसीकरणाचे अधिक उत्तम नियोजन करु शकतील आणि लसींची पुरवठा साखळी  सुरळीत राखता येईल.

देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा देत केंद्रसरकार सहकार्य करत आहे. केंद्रसरकार कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्यात देशातील लस उत्पादकांकडून 75 टक्के लसींची खरेदी करेल, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा मोफत पुरवठा केला जाईल. 

मोफत आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही माध्यमातून केंद्रसरकारने आतापर्यंत 31.83 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा (31,83,36,450) राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध केल्या आहेत.

आज सकाळी 8 वाजता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून 31,04,91,565 मात्रा वापरल्या गेल्या आहेत.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 78 लाखांपेक्षा जास्त (78,44,885) मात्रांचा साठा उपलब्ध आहे.

याशिवाय, 15,18,560 लसी पुरवठा प्रक्रियेत असून येत्या 3 दिवसात त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध होतील.   

***

UU/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1731099) आगंतुक पटल : 259
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada