कायदा आणि न्याय मंत्रालय

मुंबई उच्च न्यायालयात 4 नवीन अतिरिक्त न्यायाधीशांची नेमणूक

Posted On: 23 JUN 2021 10:28PM by PIB Mumbai

 

भारतीय राज्य घटनेच्या कलम 224 च्या उपकलम (l) ने बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी  राजेश नारायणदास लड्ढा संजय गणपतराव मेहरे, गोविंद आनंद सानप आणि शिवकुमार गणपतराव दिगे यांची  मुंबई उच्च न्यायालयाचे  अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक केली. ही नेमणूक  त्यांच्या संबंधित कार्यालयांचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी असेल. यासंदर्भातील अधिसूचना  कायदा व न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाने आज  जारी केली.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1729902) Visitor Counter : 254


Read this release in: English , Urdu , Hindi