संरक्षण मंत्रालय

हिंदी महासागर प्रदेशात भारतीय हवाई दल आणि अमेरिकी नौदल करणार युद्धसराव

Posted On: 22 JUN 2021 7:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जून 2021


हिंदी महासागर प्रदेशातील (आयओआर) मित्र  देशांच्या संरक्षण दलांबरोबर धोरणात्मक संपर्काचा भाग म्हणून, भारतीय हवाई दल 23 आणि 24 जून 21 रोजी  रोनाल्ड रेगन कॅरियर स्ट्राइक ग्रुप (सीएसजी) बरोबर होणाऱ्या युद्धसरावामध्ये  अमेरिकन नौदलाबरोबर सहभागी होणार आहे.   सीएसजी सध्या हिंद महासागर प्रदेशात (आयओआर) तैनात आहे.

दक्षिण एअर कमांडच्या एओआरमधील कवायतींमध्ये भारतीय हवाई दल  चार ऑपरेशनल कमांडअंतर्गत तळांवरुन परिचालन करताना पहायला मिळणार असून त्यात जॅग्वार  आणि सुखोई -30 एमकेआय लढाऊ विमाने ,  अवॅक्स प्रणाली असलेली विमाने, एईडब्ल्यू अँड सी ही आकाशात टेहळणी करणारी आणि इशारा देणारी रडारसज्ज विमाने आणि  हवेतल्या हवेत इंधन भरणाऱ्या विमानांचा समावेश असेल. अमेरिकेच्या सीएसजीकडून एफ -18 लढाऊ विमाने आणि  ई -2C हॉक आय एईडब्ल्यू अँड सी विमाने सहभागी होतील अशी अपेक्षा  आहे. या कवायती  तिरुवनंतपुरमच्या दक्षिणेला  पश्चिम किनारपट्टीवर दोन दिवस होणार आहेत.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1729499) Visitor Counter : 196