आदिवासी विकास मंत्रालय

एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी आदिवासी कल्याण मंत्रालय आणि एनसीईआरटीचा ‘निष्ठा’ हा संयुक्त उपक्रम

Posted On: 20 JUN 2021 8:42PM by PIB Mumbai

नव्या आदर्श वस्ती शाळांमध्ये शालेय अभ्यासातील प्राविण्य साध्य करण्याच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या धोरणानुसार दृष्टीने तीन राज्यांमधील एकलव्य आदर्श वसतिगृह शाळांमधील 120 शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी चाळीस दिवसांचा निष्ठा उपक्रम पूर्ण केला. 

 

निष्ठा हा NCERTचा  मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या  समग्र क्षमता वृद्धीच्या दृष्टीने तयार केलेला संपूर्ण देशस्तरावरील  कार्यक्रम आहे.  शिक्षक तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांमध्ये क्षमता विकसित व्हाव्यात तसेच शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारावा हे या परस्पर संवादी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

 

राष्ट्रीय शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद (NCERT) या शिक्षण क्षेत्रातील अनेकानेक महत्त्वाचे कार्यक्रम व संशोधन या संदर्भात काम करणाऱ्या शिखर संस्थेच्या सहयोगाने आदिवासी कल्याण मंत्रालयाने देशभरातील साडेतीनशे एकलव्य आदर्श वस्ती शाळांमध्ये हा कार्यक्रम राबवला.

 

हा निष्ठा कार्यक्रम पूर्ण केल्याबद्दल आदिवासी कल्याण मंत्रालयाचे मंत्री अर्जुन मुंडा यांनी एकलव्य आदर्श वस्ती शाळांच्या शिक्षकांचे अभिनंदन केले. 

 

निष्ठा प्रशिक्षणाद्वारे दर्जात्मक शिक्षणासाठी आवश्यक, सतत समृद्ध करणाऱ्या अध्यापन -अध्ययन  प्रक्रिया विकसनाची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने सेवांतर्गत प्रशिक्षण  आवश्यक असते या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणातील (NEP-2020) मांडणीवर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

***

 S.Thakur/V.Sahajrao/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1728935) Visitor Counter : 242


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi