संरक्षण मंत्रालय

गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे P11356 प्रकल्पातील दुसऱ्या युद्धनौकेची बांधणी

Posted On: 18 JUN 2021 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2021

भारतीय नौदलासाठी प्रोजेक्ट 11356  च्या दुसऱ्या युद्धनौकेच्या बांधणीचा (कील लेईन्ग )18 जून  2021 रोजी नौदलाचे उपप्रमुख व्हाइस ऍडमिरल  जी अशोक कुमार यांच्या हस्ते  समारंभपूर्वक  शुभारंभ करण्यात आला.

गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) येथे बांधकाम सुरु असलेली जहाजे  ही भारतीय नौदलासाठी दोन प्रगत युद्धनौका निर्माण करण्यासाठी रशियाबरोबर करण्यात आलेल्या  आंतर-सरकारी कराराअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या  स्वदेशी जहाज बांधणी कार्यक्रमाचा एक भाग आहेत. 25 जानेवारी 2019 रोजी संरक्षण मंत्रालय आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्यात करार झाला होता. कोणत्याही जहाजांच्या बांधकामासाठी कील लेईन्ग हा एक महत्त्वाचा टप्पा असतो जो  बांधकाम प्रक्रिया  औपचारिकरित्या सुरू होण्याचे प्रतीक आहे. पहिल्या जहाजासाठी किल 29 जानेवारी 2021 रोजी ठेवण्यात आली होती. पहिले जहाज 2026 मध्ये तर दुसरे जहाज त्यानंतर सहा महिन्यांनी तयार करून पाठवले जाईल.

व्हाईस  अ‍ॅडमिरल किरण देशमुख, कंट्रोलर वॉरशिप प्रोडक्शन अँड ऍक्विझिशन (सीडब्ल्यूपी अँड ए), सीएमडीई  संजय श्रीवास्तव, सीएमडीई  (एसपी), सीएमडीई  बी बी नागपाल (सेवानिवृत्त), अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, जीएसएल, संचालक व भारतीय नौदल आणि जीएसएलचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे व्हाइस अ‍ॅडमिरल जी अशोक कुमार यांनी शिपयार्डने कोविड निर्बंध  असूनही हा टप्पा गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. जीएसएल येथे प्रथमच अशा प्रकारच्या तांत्रिकदृष्ट्या  गुंतागुंत असलेल्या या जहाजांची स्वदेशी बांधणी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1728395) Visitor Counter : 40


Read this release in: English , Urdu , Hindi