विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कारकीर्द मधेच सोडावी लागलेल्या महिला वैज्ञानिकांचा पुनरागमनाचा प्रवास

Posted On: 17 JUN 2021 2:24PM by PIB Mumbai

 

कारकीर्द मधेच सोडावी लागलेल्या 100 महिला वैज्ञानिकांच्या दमदार पुनरागमनाचा प्रवास एका पुस्तकात मांडण्यात आला आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि समाजिक कारणाने विज्ञान क्षेत्रातील आपली कारकीर्द या महिलांना मधेच सोडावी लागली होती. अनेक अडचणी समोर असतानाही त्यांनी आपले काम पुन्हा कसे सुरु केले हे या पुस्तकात सांगितले आहे. अशा संकटाचा सामना करावा लागणाऱ्या सर्व भारतीय महिलांसाठी या झुंजार महिला आदर्श ठरु शकतील.

कारकीर्द मधेच सोडावी लागलेल्या महिला वैज्ञानिकांची, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा (डीएसटी) नॉलेज इन्वॉल्वमेंट इन रिसर्च अॅडवांसमेंट थ्रू नर्चरिंग (किरन) प्रभाग (आता तो वाइज-किरन आहे) मदत करत आहे.  विभागाद्वारे, महिला वैज्ञानिक योजनेच्या (डब्‍ल्‍यूओएस) माध्यमातून या महिलांना विज्ञानाकडे पुन्हा आणण्यात सहकार्य केले जाते. मधेच कारकीर्द सोडलेल्या आणि विज्ञानाच्या मूळ प्रवाहात परतण्याची इच्छा असलेल्या महिलांच्या समस्यांचे निराकारण डब्‍ल्‍यूओएसच्या विभिन्न घटकांच्या माध्यमातून डीएसटी करते. डब्‍ल्‍यूओएस-सी योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करुन कारकीर्दीतील नव्या शिखरावर पोहचण्यासाठी तत्पर असलेल्या निवडक महिलांचा प्रवास या पुस्तकात दिला आहे.

आयुष्यातल्या सगळ्या समस्यांवर मात करत यशस्वी झालेल्या महिला वैज्ञानिक योजनेतील 100 प्रशिक्षणार्थींची यशोगाथा या पुस्तकात सांगितली आहे.  डिजिटल आणि मुद्रीत अशा दोन्ही माध्यमात पुस्तक उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेऊन यशस्वी झालेल्या आणखीही महिला आहेत. येणाऱ्या काळात त्यांच्याही यशोगाथा सादर केल्या जातील असे डीएसटी के सचिव प्रा. आशुतोष शर्मा यांनी सांगितले.

महिला वैज्ञानिकांच्या संघर्ष प्रवासाबरोबरच प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी मिळलेली शैक्षणिक योग्यता, तज्ञ क्षेत्र, सध्याची कारकीर्दीतील स्थिती, अनुभव आणि बौद्धिक सक्षमता, कामातील तंत्रज्ञान विषयक योग्यता याबाबतची माहितीही पुस्तकात दिली आहे.

डब्‍ल्‍यूओएस-सी, ही विभागाची प्रमुख योजना आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते योजनेला 2015 मधे नारी शक्ति पुरस्कारही (राणी लक्ष्मीबाई पुरस्कार) मिळाला आहे.  डब्‍ल्‍यूओएस-सीचे कार्यान्वयन माहिती तंत्रज्ञान, पूर्वानुमान आणि मूल्यांकन परिषद (टायफेक), नवी दिल्ली द्वारे केले जाते. डीएसटीच्या अखत्यारीतील ही एक स्वायत्त संस्था आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत विज्ञान/अभियांत्रिकी/औषध निर्माण या बौद्धिक संपत्ती अधिकारा संबंधित क्षेत्रे आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी पात्र असणाऱ्या 27 से 45 वर्षा दरम्यानच्या महिलांना एका वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते.  त्यांना पेटेंट फायलिंगचे बारकावे, पेटेंटचे उल्लंघन झाल्यावर कायदेशीर कारवाई करणे आणि पेटेंट संबंधित अन्य कामांचे प्रशिक्षण दिले जाते.

भारतात बौद्धीक संपत्ती अधिकार व्यवस्थापन, त्याची सुरक्षा आणि संरचनेसाठी सक्षम असलेल्या  महिलांचा समूह विकसित करण्यात या प्रशिक्षणाच्या माध्यमातून यश आले आहे. जवळपास  800 महिलांना 11 तुकड्यांमधे प्रशिक्षण देण्यात आले आणि सुमारे 270 महिलांना पेटेंट एजंट म्हणून नोंदणीकृत केले आहे.

अनेक महिलांनी तर स्वत:ची आयपी संस्था सुरु केली आहे. काहीजणी उद्योजक झाल्या आहेत. या योजनेने महिलांना तांत्रिकदृष्टया सक्षम आणि आर्थिकदृष्टय़ा आत्मनिर्भर केले आहे. अशा अनेक प्रौढ महिलाही आहेत, आधी त्या घरातच बसून होत्या मात्र आता आयपी व्यावसायिक झाल्या आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001Q53F.jpg

***

S.Tupe/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1727874) Visitor Counter : 255