आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण –अद्ययावत स्थिती


राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 27.28 कोटींहून अधिक लसींच्या मात्रांचा पुरवठा

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप 2.18 कोटी लसींच्या मात्रांचा साठा शिल्लक

Posted On: 17 JUN 2021 10:55AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरणाचा भाग म्हणून, केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसींचा मोफत पुरवठा करत आहे. त्याशिवाय, लसींची थेट खरेदी करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकार सुविधाही उपलब्ध करुन देत आहे. केंद्र सरकारच्या कोविड महामारी प्रतिबंध आणि व्यवस्थापन धोरणात, चाचण्या, संभाव्य रुग्णांचा मागोवा, उपचार आणि कोविड नियमांचे पालन यासह, व्यापक लसीकरण हा ही एक महत्वपूर्ण उपाय आहे.

कोविड लसीकरणाच्या, मुक्त आणि गतिमान धोरणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीला, दिनांक 1 मे 2021 पासून प्रारंभ झाला आहे.

या धोरणाअंतर्गत, दर महिन्याला, कोणत्याही लस उत्पादकाकडून एकूण उत्पादित आणि केंद्रीय औषध प्रयोगशाळेने मंजुरी दिलेल्या लसींपैकी 50 टक्के लसी,केंद्र  सरकार खरेदी करत आहे. या लसींची खरेदी पुढेही सुरु राहणार असून, पूर्वीप्रमाणेच या लसींचा मोफत पुरवठा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना केला जाणार आहे.

सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत  27.28 कोटींहून अधिक  (27,28,31,900) लसींचा पुरवठा केंद्र सरकारकडून (मोफत लस पुरवठा) तसेच राज्यांना थेट खरेदी सुविधेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

यापैकी, राज्यांनी वाया गेलेल्या लसींच्या मात्रांसह एकूण 25,10,03,417 लसींच्या मात्रांचा वापर  केला आहे.(ही   आकडेवारी आज सकाळी 8 वाजता प्राप्त झालेल्या अहवालावर आधारित आहे.)

2.18 कोटींहून अधिक  (2,18,28,6,483) लसींच्या मात्रा अद्याप राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध असून त्या देण्याचे काम सुरु आहे. 

तसेच 56,70,350 लसींच्या मात्रांचा पुरवठा करण्याचे काम सुरू असून पुढील  तीन दिवसांत त्या  राज्य/केंद्रशासित प्रदेशांकडे सुपूर्द करण्यात येतील.

***

HFW/ कोविड राज्यनिहाय  स्थिती /17thJune 2021/3

Umesh U/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1727851) Visitor Counter : 165