सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
2012=100 या आधारावरील संपूर्ण भारतातील ग्राहक किंमत निर्देशांक जाहीर
Posted On:
14 JUN 2021 8:28PM by PIB Mumbai
1. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय तसेच सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने मे महिन्यासाठी (तात्पुरते) 2012=100 या आधारावरील संपूर्ण भारतातील ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आणि ग्रामीण ( R) व शहरी (U) तसेच या दोन्हीचे एकत्रित (C) संबधित ग्राहक धान्यदर निर्देशांक (CFPI) एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहेत. संपूर्ण भारत तसेच राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे गट व उपगटासाठी ग्राहक किंमत निर्देशांक (CPI)सुद्धा जाहीर केले आहेत.
2. सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील एकुण 114 शहरी बाजारपेठा व 1181 ग्रामीण बाजारपेठांना राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय तसेच सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या कर्मचाऱ्य़ांनी साप्ताहिक क्षेत्रिय भेटी देऊन ही दरांविषयी माहिती जमा केली. मे 2021 मध्ये 99.7% ग्रामीण व 97.7% शहरी बाजारपेठांनी भेटी देऊन दर नोंदवण्यात आले. बाजारपेठांनुसार 68.1% ग्रामीण व 67.5% शहरी दर नोंदवण्यात आले.
3. सर्वसामान्य निर्देशांक व ग्राहक धान्य धान्यदर यावर आधारित संपूर्ण भारतातील महागाई निर्देशांक (पॉईंट टू पॉईंट आधारावर म्हणजे आताचा महिना आणि गेल्या वर्षीचा हाच महिना उदा. मे 2021 व मे 2020) खाली दिले आहेत.
***
M.Chopade/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1727046)
Visitor Counter : 212