रेल्वे मंत्रालय
ऑक्सिजन एक्सप्रेसने 30000 मेट्रिक टन द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडला
महाराष्ट्रात 614 मेट्रिक टन ऑक्सिजनचे झाले वितरण
Posted On:
13 JUN 2021 5:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जून 2021
सर्व अडथळ्यांवर मात करत, कल्पक उपाय शोधून काढत, भारतीय रेल्वेद्वारे द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) देशभरातील विविध राज्यात पोहोचवत त्यांना दिलासा दिला आहे.
देशसेवा बजावत द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन एक्सप्रेसने 30000 मे.टन (एलएमओ) वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे.
आतापर्यंत भारतीय रेल्वेने जवळपास 30182 मेट्रिक टन द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) देशभरातील विविध राज्यांमध्ये 1734 हून अधिक टँकरमध्ये भरून पोहोचवला आहे.
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, आतापर्यंत 421 ऑक्सिजन एक्सप्रेसेसनी आपला प्रवास पूर्ण केला आहे आणि विविध राज्यांना दिलासा दिला आहे.
ऑक्सिजन एक्सप्रेसने देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये 15000 मे.टन पेक्षा जास्त जलरुप वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) वितरित केला आहे.
ऑक्सिजन एक्स्प्रेसने, महाराष्ट्रात 50 दिवसांपूर्वी म्हणजे दिनांक 24 एप्रिल रोजी 126 मेट्रिक टन ऑक्सिजन पोहोचवत वितरणाला आरंभ केला. हे वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत, महाराष्ट्रात 614 मे.टन ऑक्सिजन वितरीत करण्यात आला आहे. आतापर्यंत नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई आणि सोलापूरसह देशात 15 राज्यांमधील सुमारे 39 शहरांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन पोहोचवण्यात आला आहे.
* * *
S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1726798)
Visitor Counter : 240